Agriculture Loans: खानदेशात आता खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरण सुरू आहे. परंतु रब्बीतील पीककर्ज वितरण लक्ष्यांक या वेळेसही पूर्ण झाला नाही. राष्ट्रीयीकृत बँका हे कर्ज देण्यासंबंधी दरवर्षी हात आखडता घेत आहेत. .धुळे - नंदुरबार जिल्हा बँक, जळगाव जिल्हा बँकेने खरिपासाठी पीककर्ज वितरण लक्ष्यांक निश्चितीनंतर प्रस्ताव वेगात स्वीकारले व कर्ज वितरण वेळेत केले. पण रब्बीसाठी या बँकेला पीककर्ज वितरण लक्ष्यांक नाही. जळगाव जिल्हा बँकेला या बाबत लक्ष्यांक होता. त्यानुसार बँकेने कार्यवाही केली..Crop Loan Distribution: अमरावतीत रब्बी हंगामात बारा टक्के पीककर्जाचे वितरण.खरिपात जळगाव जिल्हा बँकेला सुमारे ११०० कोटी रुपये पीककर्ज वितरण सप्टेंबर २०२५ पर्यंत करायचे होते. धुळे - नंदुरबार जिल्हा बँकेला सुमारे २४५ कोटी रुपये पीककर्ज वितरण केले. या दोन्ही बँकांनी लक्ष्यांकातील १०० टक्के पीककर्ज वितरण खरिपात पूर्ण केले. रब्बीतही कर्ज वितरणात आघाडी घेतली. पण रब्बीत राष्ट्रीयीकृत व अन्य बँकांनी पीककर्ज वितरणात चांगली कामगिरी केली नाही..Crop Loan Distribution: परभणी जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण.मागील वेळेस रब्बीतही ७५ टक्केच पीककर्ज वितरण झाले होते. गेल्या खरिपातही गती संथ राहिली. पीककर्ज वितरण प्रशासनाने निश्चित केलेल्या लक्ष्यांकाएवढे वितरित झालेले नाही, अशी स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ८०० कोटी रुपये पीककर्ज वितरण अपेक्षित होते. .तर धुळे - नंदुरबारात मिळून सुमारे ४५० कोटी रुपये पीककर्ज वितरण अपेक्षित होते. नंदुरबारात स्टेट बँक अग्रणी बँक आहे. जळगावात सेंट्रल बँक अग्रणी बँक आहे. या दोन्ही जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत बँकांकडून सातत्याने राष्ट्रीयीकृत बँकांना व अन्य बँकांना पीककर्ज वितरणाबाबत आवाहन करण्यात आले. परंतु कार्यवाही गतीने झाली नाही..तसेच अनेक शेतकऱ्यांचे नवे पीककर्ज प्रस्ताव बँकांत पडून होते. शेतकरी नाराज असून, पीककर्ज देताना फक्त सातबारा, आठ अ आणि अलीकडच्या दोन वर्षांतील फेरफार नोंदीच मागण्याचा अधिकार बँकांना असावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. रब्बीचे पीक कर्जही १०० टक्के वितरित न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.