Parbhani News: रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये पीककर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतल्यामुळे उद्दिष्टपूर्ती कोसोदूर राहिली आहे. जिल्ह्यात १५ जानेवारी अखेरपर्यंत ७४८ कोटी ४० लाख रुपये पैकी १२४ कोटी ५५ लाख रुपये कर्जवाटप झाले असून, केवळ १६.६४ टक्के उद्दिष्ट साध्य आहे..रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये परभणी जिल्ह्यात विविध बँकांना ७४८ कोटी ४० लाख रुपये पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. .त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना ३५४ कोटी ९५ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १९० कोटी रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १४५ कोटी ३९ लाख रुपये, खासगी बँकांना ५८ कोटी ६ लाख रुपये उद्दिष्ट आहे. १५ जानेवारी अखेर एकूण ९ हजार ४४७ शेतकऱ्यांना १२४ कोटी ५५ लाख रुपये (१६.६४ टक्के) पीककर्ज वाटप झाले..Rabi Crop Loan: रब्बी कर्जवाटपात बँकांचा हात आखडता.त्यात राष्ट्रीयीकृत बँकांनी ७ हजार ११० शेतकऱ्यांना १०० कोटी ६४ लाख रुपये (२८.३५ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ६१२ शेतकऱ्यांना ६ कोटी७ लाख रुपये (४.१७ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १ हजार ४५८ शेतकऱ्यांना ७ कोटी २८ लाख ८५ हजार रुपये (३.८४ टक्के) तर खासगी बँकांनी २६७ शेतकऱ्यांना १० कोटी ५४ लाख ४ हजार रुपये (१८.१६टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. .Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज प्रस्ताव वाढू लागले; कर्ज वितरण अल्प.विविध बँकांनी ४ हजार ७३४ शेतकऱ्यांना ७३ कोटी ७३ लाख ८४ हजार रुपये नवीन पीककर्ज वाटप केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नवीन पीककर्ज वाटप केलेले नाही. .एकूण ४ हजार ७१३ शेतकऱ्यांनी ५० कोटी ८० लाख ७९ हजार रुपये एवढ्या रकमेच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले. २०२४-२५ मध्ये १५ जानेवारी अखेरपर्यंत ३५ हजार २६५ शेतकऱ्यांना २१९ कोटी ८० लाख रुपये (२८.११ टक्के) पीककर्ज वाटप झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.