Dharashiva News: जिल्ह्यात खरीपाप्रमाणे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी बँकांना हात आखडता घेतला आहे. रब्बी हंगामाचे ६२१ कोटी ४३ लाखाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत बँकांनी ९३ कोटी ३३ लाख रुपयाचे वाटप केले आहे. हे वाटप उद्दिष्टाच्या १५ टक्क्यावरच असून त्याचा लाभ केवळ चार हजार ९०३ शेतकऱ्यांना झाला आहे. यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरु राहिला. त्यात रब्बीच्या पेरण्याही उशिरापर्यंत सुरु असल्याने कर्ज वाटपावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत असले तरी बँका रब्बी हंगामात तरी हात ढिल्ला सोडणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. .जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँ, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया व भारतीय स्टेट बँक या दहा बँकांना रब्बी हंगामासाठी ३४३ कोटी १५ लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. परंतू आतापर्यंत या बँकांना तीन हजार ८०९ शेतकऱ्यांना ७४ कोटी ८६ लाखाचे कर्ज वाटप करून उद्दिष्टाच्या २२ टक्के वाटप केले आहे..Crop Loan Distribution : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात ५६० कोटींचे पीक कर्ज वितरण ; ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ .यात बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडियाचे वाटप ३५ टक्क्याच्या पुढे भारतीय स्टेट बँकेचे वाटप ३० टक्के तर अन्य सर्व बँकांचे वाटप पंचवीस टक्क्याच्या आत आहे. खासगी क्षेत्रातील अॅक्सीस, बंधन, डीसीबी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, आयडीएफसी, इंदुसंद, कोटक महिंद्रा व रत्नाकर बँक या दहा बँकांना ५८ कोटीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत या बँकांनी ४१२ शेतकऱ्यांना अकरा कोटीचे वाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेला शंभर कोटीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत बँकेने ६८२ शेतकऱ्यांना साडेसात कोटीचे वाटप करून कर्ज वाटपाचे केवळ साडेसात टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. यात बंधन, डीसीबी, आयडीएफसी व रत्नाकर बँकेने अद्याप एक रुपयाचेही वाटप केले नाही..खरिपातही हात आखडताचखरीप हंगामात यावर्षी अतिवृष्टी व अन्य कामांमुळे बँकांच्या मागे लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाचा तगादा कमी पडला. गेल्यावर्षी उद्दिष्टापेक्षा कमी पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकाविरुद्ध प्रशासनाने पोलीसांत गुन्हे दाखल केले होते. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा फायदा घेत बँकांनी हात आखडता घेतला. यात सार्वजनिक क्षेत्रातील दहा बँकांनी ६४ टक्के वाटप केले. .Rabi Crop Loan : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरण ४० टक्क्यांवरच.खासगी क्षेत्रातील दहा बँकांनी ४० टक्के वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३२० कोटीचे उद्दिष्ट असताना २८ हजार ५२६ शेतकऱ्यांना ३६९ कोटीचे वाटप करून ११५ टक्के वाटप केले. भारतीय स्टेट बँकेने ४४१ कोटीचे उद्दिष्ट असताना २९८ कोटी ( ६८ टक्के), बँक ऑफ महाराष्ट्रने २७१ कोटीचे उद्दिष्ट असताना १५३ कोटी (५६), आयसीआयसीने ८१ कोटी उद्दिष्ट असताना २२ कोटी (२७ टक्के) वाटप केले. बँक ऑफ इंडिया व सेंट्रल बँक ऑफ इंडियाने उद्दिष्टापेक्षा जास्त वाटप केले. इंदुसंद बँकेने २०३ टक्के कर्ज वाटप केले तर एचडीएफसीने ९२ टक्के वाटप केले. बंधन व डीसीबीने दमडाही वाटप केला नाही..रब्बीचे हंगामातील तपशीलरब्बी हंगामाचे उद्दिष्ट - ६२१ कोटी ४३ लाखआतापर्यंत वाटप - ९३ कोटी ३३ लाखलाभार्थी शेतकरी - चार हजार ९०३.वाटप टक्केवारी - १५.०२ टक्केरब्बीचे हंगामातील तपशीलरब्बी हंगामाचे उद्दिष्ट - ६२१ कोटी ४३ लाखआतापर्यंत वाटप - ९३ कोटी ३३ लाखलाभार्थी शेतकरी - चार हजार ९०३वाटप टक्केवारी - १५.०२ टक्के.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.