Chandrapur News : गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आड कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या माध्यमातून होणारा अन्याय दूर करीत कुरेशी समाजाला व्यवसायाकरिता भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया जमीयतुल कुरेशी समाज शाखा गडचांदूरच्या वतीने करण्यात आली. .राजूरा मतदार संघाचे आमदार देवराव भोंगळे यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अरविंद होडे, कोरपना तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार, माजी सरपंच शेख रऊफ, सतीश बेतावार, महासचिव रफीक निजामी, नेहाल निजामी, शेख मेहताब, पाशा नजीर निजामी, नेहाल निजामी, बिलाल निजामी, इरफान पाशा, धर्मा वाघमारे, वैभव पोटे यांची उपस्थिती होती. .Cow Slaughter Ban Law: कुरेशींचे आंदोलन आणि गोवंश कायद्याचे राज्य.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्रातील कुरेशी समाज हा आपला पारंपारिक व्यवसाय करतो. त्यामध्ये कायदेशीररीत्या पशू व्यापार, वाहतूक तसेच नियमाप्रमाणे खाण्यास योग्य असलेल्या तसेच ज्यांच्यावर बंदी नाही अशा जनावरांची कत्तल, खरेदी विक्री करतो. मात्र गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यापासून कुरेशी समाज बांधवांवर सातत्याने हल्ले वाढले आहेत. गोरक्षकांमार्फत त्यांच्यावर जातीय अत्याचार तसेच बेकायदेशीर पोलिस कारवायांचे सत्र सुरु आहे..या माध्यमातून कुरेशी समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपूासन या कारवायांमध्ये सातत्याने वाढच झाली आहे. यामुळे कुरेशी समाजावर आर्थिक, सामाजिक, कायदेशीर प्रतिष्ठेचा प्रचंड भार येत असून समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर गदा आणण्याचे प्रयत्न होत आहेत. याला कंटाळत कुरेशी समाजाने व्यापार बंद आंदोलन पुकारले आहे..Cow Slaughter Ban: गोवंश हत्याबंदी: पशुपालनाचा घातक अडथळा.याचा फटका मोठ्या प्रमाणावर शेतकरी व पशुपालकांना बसत असल्याचे चित्र आहे. भारत हा मांस निर्यात करणारा जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. परंतु कुरेशी समाजाने सद्या जनावरांच्या व्यापारा संदर्भाने बहिष्काराची भूमिका घेतल्याने त्याचा मांस निर्यातीला देखील फटका बसला आहे. .यासोबतच कुरेशी समाजाच्या इतरही दहा मागण्या आहेत. त्यांची देखील शासनाने सकारात्मक दखल घेत पूर्तता करण्यासंदर्भाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. अनीस कुरेशी, रियाज सुलेमान खान, शेख रिजवा शेख शब्बीर, अतिक कुरेशी, हनीफ कुरेशी यांची यावेळी उपस्थिती होती.आमदारांचे सकारात्मक आश्वासनकुरेशी समाजाच्या मागण्यांसंदर्भाने शासनस्तरावर पाठपुरावा करीत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार भोंगळे यांनी यावेळी दिले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.