Pushkar Mela: पुष्कर मेळा; भारतीय पशुधनाचा भव्य महोत्सव
Rajasthan Tourism: राजस्थानमधील पुष्कर येथे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भरवला जाणारा हा मेळा धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उंटांचा व्यापार, लोककला, श्रद्धा आणि पर्यटन यांचा संगम असलेल्या या मेळ्याने भारताच्या ग्रामीण संस्कृतीचा आत्मा आजही जिवंत ठेवला आहे.