Rainfall Shortage Issue: पुसद तालुक्यात यंदा पावसाने अपेक्षित सरासरी गाठलेली नाही. मंगळवार (ता. २२)पर्यंत तालुक्यात ६३०.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, जून ते सप्टेंबर या कालावधीतील सामान्य ७५९ मिलिमीटर पर्जन्यमानाच्या तुलनेत १२८.७ मिलिमीटर म्हणजेच २४ टक्के तूट आहे.