Maharashtra Dam Levels : पुसद तालुक्याचे वरदान असलेल्या अप्पर पूस प्रकल्पात (पूस धरण) सध्या ६२.०४ टक्के पाणीसाठा आहे. हा प्रकल्प सिंचनासाठी महत्त्वाचा असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता ऑगस्टमधील पावसाकडे लागल्या आहेत..माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून १९७१ मध्ये उभारण्यात आलेल्या पूस धरणामुळे पुसद शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासोबतच सुमारे नऊ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. प्रकल्पाचा डावा कालवा १६ किलोमीटर, तर उजवा कालवा २१ किलोमीटर लांबीचा आहे..Water Management: धरण आंधळे अन् पाट पांगळे.प्रकल्पाची मृत पाणीसाठा क्षमता २२.६६ दशलक्ष घनमीटर, उपयुक्त पाणीसाठा ९१.२६ दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा क्षमता ११३.९२ दशलक्ष घनमीटर आहे. रविवारी (ता. ९) प्रकल्पात ५६.६२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त, तर एकूण ७९.२८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे..Dam Water Storage : नाशिकमधील सर्व धरणे तुडुंब .गतवर्षी याच दिवशी धरणात ६०.१० टक्के पाणीसाठा होता. यंदा जूनअखेर झालेल्या पावसानंतर जुलैच्या अखेरच्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. .मात्र, यंदा पुस नदीला अद्याप मोठा पूर आलेला नाही. ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. धरण भरल्यास आगामी रब्बी हंगामासाठी सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता वाढणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.