Purandar Water Issue: पुरंदर तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता आणि भूजलपातळीत झालेली घट यामुळे अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती पुरंदरमार्फत तालुक्यातील १९ गावांसाठी एकूण २५ पाणीटँकर कार्यरत असून प्रशासनाकडून नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला जात आहे..टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये पुरपोखर, पिसे, भिवरी, साकुर्डे, बहिरवाडी, वागदरवाडी, भिवडी, राख, राजुरी, वाल्हे, सोनोरी, बोपगाव, शिवरी, कोडीत बुद्रुक, दौंडज, झेंडेवाडी, गराडे, टेकवडी आणि धनकवडी या गावांचा समावेश आहे. या गावांतील विहिरी, बोअरवेल आणि अन्य पारंपरिक जलस्रोतांची पाणीपातळी लक्षणीय घटल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे..Rural Water Crisis: तलाव कोरडे, भूजल आटले... पंचायतीची जबाबदारी काय?.नागरिकांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून टँकरच्या फेऱ्यांवर पंचायत समितीकडून नियमित देखरेख ठेवली जात आहे..Tanker Water Supply: पुरंदरमधील १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा.तसेच पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त उपाययोजनाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले..टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त उपाययोजनाही केल्या जातील.वैभव ढोक, अभियंता, पाणीपुरवठा विभाग,पंचायत समिती, पुरंदर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.