Pune News: पुरंदर तालुका प्रामुख्याने सीताफळ, अंजीर पिकासाठी ओळखला जातो. येथील शेतकरी फळपिकांबरोबर भाजीपाला पिकाकडे वळू लागले आहेत. तालुक्यात पितृपंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे २०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर मेथी पिकाची पेरणी केली गेली आहे. .त्यामुळे तालुक्याची ओळख आता भाजीपाला पिकांचा तालुका म्हणून निर्माण होऊ लागली आहे.जिल्ह्यातील पूर्व हवेली व दौंड भागात मेथीचे मोठ्या प्रमाणात पेरणी करून शेतकरी उत्पादन घेतात. पुरंदर तालुक्यातील दिवे, काळेवाडी, झेंडेवाडी, सोनोरी हे भाग फळपिकाचे मोठे आगार आहे..Dairy Farming: दुधातील फॅट, एसएनएफवर परिणाम करणारे घटक.मात्र, या भागातील शेतकरी कमी कालावधीत अधिक उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने अंजीर, सीताफळ, वाटाणा याबरोबरच मेथी, कोथिंबीर, कांदापात, शेपू या पालेभाज्यांचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत आहे. उत्पादित शेतीमालाची शेतकरी सासवड, पुणे आणि हडपसर येथील मार्केटमध्ये विक्री करतात..गौरी-गणपती व पितृपंधरवडा या दिवसांत मेथीच्या भाजीला हमखास बाजार मिळतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या आसपास मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. या वर्षी हवामान बदलामुळे आणि सततच्या पावसामुळे पूर्व हवेलीतील मेथीला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याने मेथीचे बाजार कडाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे..Farm Road Drive : सेवा पंधरवाड्यात ‘पाणंद’साठी विशेष मोहीम .यावर्षी गौराई सणाला मेथीच्या प्रति गड्डीला पंधरा ते वीस रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळाला आहे.पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला असल्याने हवेली तालुक्याच्या पूर्व भागात असलेले काही व्यापारी थेट बांधावर येऊन मेथीची खरेदी करीत आहेत..दिवे परिसरातील शेतकरी प्रतिकूल हवामानात देखील एक ते सव्वा महिन्यात मेथीचे उत्पादन घेतात. सध्या अनेक ठिकाणी मेथी काढणीयोग्य झाली आहे. मात्र मजुरांचा तुटवडा, वाहतूक खर्च यामुळे शेतकरी देखील बांधावरच मेथीची विक्री करीत आहेत..परिसरात जवळपास ५० एकरांहून अधिक क्षेत्रांवर मेथीचे पीक घेतले आहे. मी तीस गुंठे क्षेत्रांवर मेथीचे पीक घेतले. तुषार सिंचन प्रणालीचा वापर केल्याने पीक जोमदार आले. सोमर्डी येथील व्यापाऱ्यांनी ४७ हजार रुपयांना मेथी पिकाची खरेदी केली.- नीलेश झेंडे, शेतकरी, दिवे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.