Technical Issue in Farmer Loan Scheme: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यात पहिल्या टप्प्यात ३९२५ शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र, आधार प्रमाणीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया संथ झाली असून, शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे..पुरंदर तालुक्यातील ९४ विकास सोसायट्यांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे. मात्र तालुक्यातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांवर दिवसभर सर्व्हर बंद राहत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. रात्री १० ते सकाळी ९ या कालावधीतच सर्व्हर सुरळीत चालत असल्याने शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे..Farmer Loan Waiver: ‘कर्जमुक्ती’च्या उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध होणार.आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरही त्याची पावती किंवा प्रिंट डाउनलोड होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ तयार झालेले नाहीत किंवा वारस नोंदी प्रलंबित आहेत, त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व्हरचा वेग वाढविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सहायक निबंधक कार्यालयाने दिली..दरम्यान, ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांवर शासकीय सेवांचे अधिकृत दरपत्रक प्रदर्शित नसल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. काही केंद्रांवर नियमापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्याचा आरोप होत असून, शैक्षणिक दाखले मिळण्यासही विलंब होत असल्याचे नागरिकांनी सांगितले..Farm Loan Waiver: कर्जमाफीस पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार.केंद्रचालक प्रतिनिधी दीपक कड म्हणाले, की रात्रीच्या वेळी सर्व्हर सुरळीत चालत असल्यास नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी रात्रीही काम केले जाते. मात्र, तांत्रिक अडचणींचा ठपका केंद्रचालकांवर ठेवला जातो. त्यामुळे शासनाने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे..पालक स्मिता जगताप यांनी शैक्षणिक दाखल्यांसाठी काही सेवा केंद्रांवर जादा शुल्क आकारले जात असल्याचा आरोप केला. तसेच सर्व्हरच्या कारणास्तव दाखले मिळण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.