Custard Apple Farmer Support: अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कडक नियमांमुळे पुरंदर तालुक्यातील पल्प उत्पादकांनी खरेदी बंद केली आहे. त्यामुळे सीताफळाचे दर कोसळले असून उत्पादक संकटात सापडले आहेत. हजारो रुपयांना विकले जाणारे क्रेट आता १०० ते २०० रुपये दराने विकावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत..तालुक्यात यंदा सीताफळाचा हंगाम जोमात असतानाच एफडीएने भेसळ रोखण्यासाठी पल्प केंद्रांवर कारवाई सुरू केली आहे. नियमांचे पालन करून पल्प टिकवणे कठीण असल्याचे सांगत पुरंदरमधील सुमारे ३० केंद्रांनी उत्पादन बंद ठेवले आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला असून, व्यापाऱ्यांची संख्याही घटली आहे..Farmer Crisis: कर्जमाफी होणार नसल्याच्या भीतीनेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नाना पटोलेंचा विधानसभेत गंभीर आरोप.दुसरीकडे, मे महिन्यातील वाढते तापमान आणि पावसाच्या ओढीमुळे फळांचा आकार लहान राहिला असून बियांचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी तीन ते साडेतीन हजार रुपये मिळणाऱ्या क्रेटला आता जेमतेम ८०० ते १००० रुपये बाजारभाव मिळत आहे. मध्यम व लहान फळांची अवस्था तर अत्यंत बिकट असून ती कवडीमोल बाजारभावाने विकावी लागत आहेत..Farmer Issue: शेती-मातीचे प्रश्न मांडणार नसाल, तर राजीनामे द्या : किसान सभा.शेतकऱ्यांच्या सीताफळाचा बाजारभाव ढासळल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या बाबत पल्प उत्पादक व्यवसायांची बैठक या अगोदर घेण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा बैठक घेऊन पल्प उत्पादन सुरू करण्यासंदर्भातचा निर्णय घेऊन शासनातर्फे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाईल.श्रीधर चव्हाण, पुरंदर तालुका कृषी अधिकारी.सीताफळ नाशवंत असल्याने ते तातडीने विकावे लागते. पल्प निर्मिती बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने या उद्योगाला प्राधान्य देऊन मार्ग काढावा.नवनाथ गायकवाड, शेतकरी, शिवरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.