Flower Farming Crisis: दरवर्षी श्रावण महिन्यात शेवंतीच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो. मात्र यंदा बाजारभाव कोसळल्याने पुरंदर तालुक्यातील शेवंती उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. फुलांची आवक वाढल्याने पुणे बाजारात शेवंतीला केवळ ३० रुपये बाजारभाव मिळत आहे. यातून उत्पादन खर्च निघणे अवघड बनल्याने उत्पादकांत नाराजी पसरली आहे..शेवंतीला दरवर्षी श्रावण महिना, गणपती, दसरा, दिवाळी दरम्यान चांगला भाव मिळतो. यामुळेच या काळात अधिकची फुले बाजारात विक्रीसाठी कशी येतील, या दृष्टीने शेतकरी प्रयत्नशील असतो..Kharif Crop Prices: खरीप पिकांच्या भावात तेजी राहणार का?.मागील वर्षी श्रावण महिन्यात १५० ते २०० रुपयांपर्यंत बाजारभाव शेवंती फुलांच्या वेगवेगळ्या प्रकारांना मिळत होते. हीच अपेक्षा ठेवून यंदा शेवंती उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करत शेवंती फुलांचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले आहे. मात्र, अधिक प्रमाणात उत्पादन झाल्याने बाजारात आवक वाढली..Flower Farming: तंत्रशुद्ध फुलशेतीत नाव कमावलेले प्रवीण.पुरंदर तालुक्यातील पूर्व भागात माळशिरस, टेकवडी, आंबळे, राजेवाडी, पोंढे या परिसरात मोठ्या प्रमाणावर सध्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर बाजारभाव कोसळल्याचा मोठा परिणाम होणार आहे..शेतकऱ्यांची वाढली चिंतासध्या शेवंतीवर्गीय भाग्यश्री फुलांचा हंगाम जोरात सुरू आहे. या फुलांना २५ ते ३० रुपयांपर्यंत बाजारभाव सध्या मिळत आहे. या फुलांच्या रोपांपासून ते औषधे, खते, वाढलेली मजुरी व मशागतीचा विचार करता सध्या मिळत असलेल्या बाजारभावात उत्पादन खर्च देखील निघणे अवघड बनल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.