Pune News : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने सहा हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस परवानगी दिली आहे. पुढील महिनाभरात भूसंपादनासाठी निधी उपलब्ध होईल. त्यानंतर तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली..विमानतळाच्या तीन हजार एकर क्षेत्रापलीकडे काही शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली आहे. या जमिनीची मोजणीही सुरू करण्यात आली असून, या ठिकाणी एरोसिटी विकसित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यापैकी दहा टक्के जमीन परतावा याच एरोसिटीत दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..Airport Naming Issue: विमानतळाला मोदींचे नाव देऊनच दाखवा: सपकाळ.पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सात गावांमधील सुमारे तीन हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे..दरम्यान, कर्जाचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाल्यानंतर तो तातडीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी सुमारे महिनाभराचा काळ जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला येत्या महिनाभरात त्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले..Purandar Airport: पुरंदर विमानतळामुळे विकासाला प्रोत्साहन .त्यासाठी एका राष्ट्रीयकृत बँकेबरोबर करार करण्यात येणार आहे. यापूर्वी रिंगरोडच्या भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे मोबदला देण्यात आला होता. मात्र, विमानतळाच्या भूसंपादनापोटीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचे निश्चित केल्याचेही डुडी यांनी सांगितले..‘एरोसिटीबाबतचा निर्णय सिडको घेणार’विमानतळाच्या तीन हजार एकर परिसराशेजारी एरोसिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी विमानतळाच्या क्षेत्रापलीकडील शेतकऱ्यांनी संमतीने जमिनी देण्याचे कबूल केले आहे. यात आणखी काही जमिनी गरजेच्या असून, त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. .संमतीने दिलेल्या जमिनीच्या मोजणीचे काम आता सुरू केले असून, पुढील आठवडाभरात हे काम सोपवण्यात येणार आहे. या एरोसिटीतच शेतकऱ्यांना दहा टक्के विकसित भूखंड देण्यात येणार आहे. एरोसिटी नेमकी कशी व कुठे असावी? या संदर्भात सिडको निर्णय घेईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.