Farmers Relief Due To Rain In Punjab: पावसामुळे पंजाबमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी पंजाबच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. यामुळे रब्बीतील गहू पिकाच्या (Rabi Wheat Crop) वाढीसाठी आवश्यक असलेला ओलावा मिळाला आहे. यामुळे यंदा बंपर उत्पादन मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी आता पिकाला अतिरिक्त पाणी देणे थांबवावे आणि संभाव्य कीडनाशक प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिकाकडे लक्ष देण्याचा सल्ला शेती तज्ज्ञांनी दिला आहे. पुढील काही दिवसात येथे आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे..रब्बी हंगामात दीर्घकाळ कोरडे हवामान राहिले. वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता. पण आता पावसाने ही चिंता मिटली आहे. पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जमिनीत पुन्हा ओलावा झाला आहे. यामुळे रब्बी हंगामातून भरघोस उत्पादन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे..रब्बीतील पहिला पाऊस राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे. यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसात पिकाला पाणी दिले होते, त्यांनी शेतातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे. तसेच तूर्त शेतकऱ्यांनी खतांची फवारणीदेखील करु नये. कारण पिकाची अनावश्यक वाढ होऊन पीक जमिनीवर लोळू शकते, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे..Rabi Crop Growth: यंदा जोमदार पिकांमुळे उत्पन्नाच्या आशा.''मान्सून हंगाम संपल्यानंतर पाऊस पडला नव्हता. पण आताच्या या पावसामुळे पिकांना फायदा होईल. आमची मोठी चिंता म्हणजे सोसाट्याचा वारा,” असे मोहाली येथील शेतकरी गुरनाम सिंग सांगतात. .Rabi Season: रब्बी हंगामात आशेची हिरवळ.लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठाच्या हवामान बदल आणि कृषी हवामानशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. पवनीत कौर किंगरा यांनी सांगितले की, हा पाऊस गहू पिकांसह इतर रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरेल. “हा पाऊस हिवाळी पिकांसाठी चांगला आहे. कारण रब्बी हंगामात याआधी पावसाची नोंद झाली नव्हती. या पावसामुळे रब्बीतील सर्व पिकांना आवश्यक असलेला ओलावा मिळणार आहे,” असे त्या पुढे म्हणाल्या..पंजाबमध्ये २०२४-२५ च्या रब्बी हंगामात सुमारे १७९ लाख टन गव्हाचे उत्पादन झाले होते. जे देशातील एकूण गहू उत्पादनाच्या सुमारे १६ टक्के एवढे आहे.कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, यंदाच्या रब्बी हंगामात देशातील गहू पीक क्षेत्रात ६ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. सध्या गहू पीक क्षेत्र विक्रमी ३३४.१ लाख हेक्टरवर आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.