ठळक मुद्देपंजाब विधानसभेत बियाणे (दुरुस्ती) विधेयक, २०२५ मंजूरयाअंतर्गत बोगस अथवा निकृष्ट बियाण्यांची विक्री करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद .Poor Quality Seeds: पंजाब विधानसभेने दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सोमवारी शेती, उद्योग, कर आकारणी, घरे बांधणी आणि शहरी विकासाशी संबंधित सहा विधेयकांना मंजुरी दिली. त्यातील मुख्यतः बियाणे (दुरुस्ती) विधेयक, २०२५ लक्षवेधी ठरले. यामुळे आता बोगस अथवा निकृष्ट बियाण्यांची विक्री करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे..निर्धारित मानकांनुसार बियाण्यांचे उत्पादन घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबतच्या तक्रारींची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. निकृष्ट बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका बसतो. तसेच यामुळे राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची हानी होते. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी, पंजाबमध्ये लागू असलेल्या बियाणे कायदा, १९६६ च्या कलम १९ नंतर कलम १९ ए समाविष्ट केले आहे. .Poultry Feed : निकृष्ट दर्जाच्या खाद्याचा पोल्ट्री व्यावसायिकांना पुरवठा.यानुसार, बियाणे (पंजाब सुधारणा) विधेयक, २०२५ अंतर्गत, संबंधित कंपनीला पहिल्या गुन्ह्यासाठी एक ते दोन वर्षांची शिक्षा आणि ५ ते १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद केली आहे. पुन्हा असा गैरप्रकार केल्यास दोन ते तीन वर्षांची शिक्षा आणि १० ते ५० लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. डीलर अथवा इतर कोणत्याही व्यक्तीने अशाच प्रकारचा गैरप्रकार केल्यास ६ महिने ते १ वर्षाची शिक्षा आणि पहिल्या गुन्ह्यासाठी १ ते ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल. पुन्हा असा गुन्हा केल्यास १ ते २ वर्षांची शिक्षा आणि ५ ते १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो..Indian Seed Congress 2024 : निकृष्ट बियाणे नियंत्रण आराखडा स्वीकारणार.आधी कशी होती तरतूद?याआधी, पहिल्या गुन्ह्यासाठी ५०० रुपये दंड आणि पुन्हा असा गैरप्रकार घडल्यास १ हजार रुपये दंड आणि ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद होती..कृषिमंत्री गुरमीत सिंग खुदियां यांनी विधानसभेत हे विधयेक सादर केले. दरम्यान, काँग्रेस आमदार राणा गुरजीत सिंग यांनी हे विधेयक परिपूर्ण नसल्याचे म्हटले. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी बियाण्यांचे योग्य प्रमाणन करण्यासाठी राज्य बियाणे प्रमाणन संस्थेला अधिकार द्यायला हवेत, असे ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.