Pune News: ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षांची संधी उपलब्ध व्हावी आणि वाचन संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने हाती घेतलेला ‘समाजमंदिरांचे ज्ञानमंदिरात रूपांतर’ हा उपक्रम यशस्वी ठरत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५७३ समाजमंदिरांना ग्रंथालय व अभ्यासिकेचे नवे रूप देण्यात आले असून, ही ज्ञानमंदिरे आता पुस्तकांनी आणि अभ्यास साहित्याने गजबजू लागली आहेत..जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पातील विशेष तरतुदीतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे गावागावातील समाजमंदिरांचा कायापालट झाला आहे. केवळ कार्यक्रमांपुरत्या मर्यादित राहिलेल्या या वास्तू आता ज्ञानाची केंद्रे बनल्या आहेत..Rural Education: खोट्या नाट्या अकलेचे तारे.मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून, विशेषतः तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले..Rural Education: खोट्या नाट्या अकलेचे तारे.प्रत्येक ज्ञानमंदिरात अभ्यासासाठी आवश्यक फर्निचर, ज्यात दोन टेबल दहा खुर्च्या आणि पुस्तकांसाठी कपाटे यांचा समावेश आहे. तसेच, चालू घडामोडी, इतिहास, थोर समाजसुधारकांची चरित्रे आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा १२६ पुस्तकांचे दोन संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डिजिटल युगाची गरज ओळखून प्रत्येक केंद्रात एक संगणकदेखील देण्यात आला आहे..नागरिकांचा उत्साह पाहून काही निवडक केंद्रांमध्ये लोकसंख्या आणि मागणीनुसार संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचारही जिल्हा परिषद करीत आहे. एखाद्या समाजमंदिराचे ज्ञानमंदिरात रूपांतर करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागवला जातो. त्या प्रस्तावावर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून पुढील प्रक्रिया केली जाते..Quality Education : गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवा.समाजमंदिराचे ज्ञानमंदिरात रुपांतराची स्थितीतालुका संख्याआंबेगाव ३६बारामती ३०भोर ६४दौंड ४९.हवेली ४१इंदापूर ८८जुन्नर २७खेड ४६मावळ ३८.मुळशी ४३पुरंदर ३३शिरूर ५५वेल्हे २३एकूण ५७३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.