Weather Alert: पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) सायंकाळपासून विविध तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. दिवसभर कडक उन्हामुळे तापमानात वाढ झाल्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारांसह पाऊस कोसळला. पुरंदर, बारामती, भोर, वेल्हे (राजगड) तसेच कापूरहोळ परिसरात या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून पुणे शहरात तुरळक सरी बरसल्या..पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस, टेकवडी, राजेवाडी, पारगाव आणि नायगाव परिसरात सुमारे एक तास गारपीट झाली. या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. आंबा पिकाचा मोहर, कैऱ्या तसेच डाळिंब बागांनाही फटका बसला आहे. कापूरहोळ व परिसरातही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडून उभ्या पिकांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला..Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका.बारामती तालुक्यातील काटेवाडी भागात रात्री उशिरा गारांसह मुसळधार पाऊस झाल्याने गहू व द्राक्ष बागांचे नुकसान झाले. भोर तालुक्यातही गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून कापणी केलेले पीक भिजून खराब झाले आहे. वेल्हे तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने ओढे-नाले वाहू लागले, तर आंबा बागांचे नुकसान झाले आहे..मुळशी तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. ताम्हिणी, पिरंगुट, पौड परिसरात अर्धा ते एक तास पाऊस कोसळला. काही ठिकाणी गारांचाही हलका मारा झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान झाले. तसेच भाजीपाला व आंबा बागांनाही फटका बसला असून मोहर गळून पडला..Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा.अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. शेतकऱ्यांकडून पंचनामे करून मदतीची मागणी होत आहे. पूर्वमोसमी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे..गारांच्या पावसामुळे मका, कांदा गोट बी, तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तात्काळ पंचनामे करून मदत मिळणे गरजेचे आहे.- शरद गोडांबे, प्रगतशील शेतकरी, घोटावडे, मुळशी.नुकसानग्रस्त पिकेगहू, ज्वारी, बाजरीकांदा, कडधान्ये पिकेहरभरा मका, कडवळद्राक्ष, आंबा (मोहर व कैऱ्या)भाजीपाला पिके.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.