Pune News: जनुकीय संपादनाद्वारे सुगंध नसलेल्या भात जातीमध्ये सुगंध आणणारे तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. वनस्पतिशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी सुगंध नसलेल्या भाताच्या ‘आयआर-६४’ जातीमधील OsBADH२ या जनुकाचे ‘क्रिस्पर-कॅस’ तंत्रज्ञानाने जनुकीय संपादन केले. .यामुळे या जातीमध्ये बासमतीप्रमाणेच सुगंध निर्माण करणाऱ्या ‘२-एसिटिल-१-पायरोलिन’ या रासायनिक संयुगाची निर्मिती शक्य झाली आहे. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमध्ये ‘आयआर-६४’ जातीच्या भाताचे तीन पिढ्यांपर्यंत उत्पादन घेण्यात आले. यामध्ये सुगंध टिकून राहिला आहे, अशी माहिती विद्यापीठातील ‘मॉलेक्युलर बायॉलॉजी ॲण्ड जेनेटिक इंजिनिअरिंग’ विभागातील संशोधक आणि वनस्पतिशास्त्र विभागातील प्राध्यापक ए. बी. नदाफ आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. विठ्ठल बारवकर यांनी दिली..Agriculture Innovation: अमेरिकेतील फळबागेत ‘पीक युवर ओन’ उपक्रम.सध्या जगभरातील संशोधक भात उत्पादकता वाढवण्याबरोबरच गुणवत्ता, पोषकता सुधारण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थिनी डॉ. वाचा भट्ट यांनी प्रा. ए. बी. नदाफ, डॉ. विठ्ठल बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भात पिकामध्ये सुगंध आणण्यासाठी विशेष संशोधन केले आहे. याबाबत माहिती देताना प्रा. नदाफ म्हणाले, की सुगंध नसलेल्या ‘आयआर-६४’ या भात जातीतील ‘OsBADH२’ या जनुकाचे क्रिस्पर-कॅस तंत्रज्ञानाचा वापर करत जनुकीय संपादन करण्यात आले..यामुळे या जातीमध्ये बासमतीसारखा सुगंध निर्माण करणारे ‘२-एसिटिल-१-पायरोलिन’ हे रासायनिक संयुग तयार करण्यात यश आले आहे. हरियानाच्या केंद्रीय विद्यापीठातील प्रा. रूपेश देशमुख आणि टेक्सास टेक विद्यापीठातील डॉ. गुणवंत पाटील यांची संशोधन पद्धत विकसित करण्यासाठी सहकार्य मिळाले. ‘प्लॅन्ट फिजिओलॉजी रिपोर्ट्स’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हा शोधनिबंध नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. .Agriculture Innovation: ‘एचटीबीटी’ला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करा.गेल्या काही वर्षांपासून प्रा. ए. बी. नदाफ हे सुगंधी भात जातींबाबत संशोधन करत असून त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. प्रयोगशाळेत यशस्वी झालेले हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय पातळीवरील परवानगी आणि संशोधन संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. .संशोधनाची वैशिष्ट्ये भारतीय उपखंडातील ‘आयआर ६४’ या भात जातीवर संशोधन.जनुकीय संपादनानंतरही सर्वसामान्य वातावरणात पीक वाढीवर कोणताही प्रतिकूल परिणाम नाही.प्रयोगशाळेत जनुकीय संपादन करत प्रत्यक्ष रोप लागवड, पुनरुत्पादन चाचण्या. यामध्ये तीन पिढ्यांनंतरही तांदळाचा सुगंध कायम.....असे आहे क्रिस्पर-कॅस तंत्रज्ञानक्रिस्पर-कॅस तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना डॉ. विठ्ठल बारवकर म्हणाले की, जीवाणू स्वतःच्या संरक्षणासाठी (इम्यून सिस्टम) नैसर्गिकपणे जे बदल करतात, त्याच आधारावर क्रिस्पर कॅस हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानास इंग्रजीत ‘Clustered Regularly Interspaced Short Palindromic Repeats-CRISPR-associated protein’ असे म्हणतात. हे एक प्रकारचे जनुकीय संपादनाचे साधन (जेनेटिक एडिटिंग टूल) असून, विशिष्ट जनुकांना अचूकपणे संपादित करण्यात शास्त्रज्ञांना उपयुक्त ठरते. .सुगंधी तांदळाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असते. हे लक्षात घेऊन भाताच्या ‘आयआर-६४’ या जातीमध्ये सुगंध निर्माण करण्यासाठी प्रथमच संशोधन करण्यात आले. त्यासाठी जैव तंत्रज्ञानातील ‘क्रिस्पर-कॅस’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे जनुकामध्ये हवे तसे बदल घडवून वनस्पतींमध्ये नवीन गुणधर्म निर्माण करता येतात. त्यातून विकसित केलेल्या सुगंधी आयआर-६४ या जातीच्या तीन पिढ्यापर्यंत चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. विविध संशोधन पातळ्या आणि शासकीय परवानगीनंतर ‘सुगंधी आयआर-६४’ या भात जातीला व्यावसायिक लागवडीसाठी मान्यता मिळू शकेल.- प्रा. ए. बी. नदाफ (वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.