Pune News : जिल्ह्यात चार महिने दमदार पाऊस कोसळल्यानंतर आता जोर ओसरला आहे. तरी धरणांत पाण्याची अजूनही आवक सुरू असून, जिल्ह्यातील १६ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी अनेक धरणांतून सोडण्यात आलेल्या विसर्गात घट केली जात आहे. त्यामुळे नद्यांतील पाण्याची पातळी कमी होत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली..यंदा मे महिन्यापासून जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली होती. आतापर्यंत २५ धरणे शंभर टक्के भरली आहेत. मागील पंधरा दिवस पावसाने मराठवाड्यासह, पुणे, नगर, सोलापूर, नाशिक भागांत चांगलाच धुमाकूळ घातला होता. यामुळे २० सप्टेंबरपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली असून तो आज तागायत सुरू आहे. परंतु २८ सप्टेंबरपासून पावसाने काहीशी उघडीप देण्यास सुरुवात केली आहे..Dam Water Discharge : वाघूर, गिरणातून विसर्ग.मागील सात ते आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणाची स्थिती निवळून ऊन पडत आहे. सध्या टेमघर, पवना, आंध्रा, चिल्हेवाडी, विसापूर ही धरणे वगळता इतर सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण धरणाची क्षमता असलेल्या १९८.३४ टीएमसीपैकी १९६.५७ टीएमसी म्हणजेच ९९.१० टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे..तर मागील चोवीस तासांमध्ये धरण्यात नव्याने २.११ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. या धरणातील आगामी काळात पाणी उपलब्ध होण्यासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग हळूहळू कमी करण्यात येत आहे. मात्र जसजशी पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली, तशतशी धरणांतील पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली आहे..Dam Water Storage : नाशिकमधील सर्व धरणे तुडुंब .परंतु उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या धरणातून विसर्ग अजूनही सुरू आहे. सुमारे १६०० क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सुरू आहे. याशिवाय इतर अनेक धरणांतून अजूनही काही प्रमाणात विसर्ग सुरू आहे..रविवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू असलेला धरणनिहाय विसर्ग (क्युसेकमध्ये) ः पानशेत ६००, खडकवासला १३६२, चासकमान ५००, कळमोडी ७८, आंध्रा ३४६, नाझरे २४२, गुंजवणी २५०, नीरा देवघर ७५०, वीर ११७५, पिंपळगाव जोगे १०००, येडगाव २२००, वडज १५०, चिल्हेवाडी २००, घोड ३०००, विसापूर १२२०, उजनी १६००..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.