Pune News: पावसाचे तीन महिने संपले आहेत. या काळात पुणे जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. एकंदरीत कमी कालावधीत अधिक पाऊस पडला असल्याचे दिसून आले आहे. तीन महिन्यांत सरासरी ७०५.५ पैकी ६५७.४ मिलिमीटर म्हणजेच ९३ टक्के पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. .कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी जाहीर केली असून त्यावरून ही माहिती समोर आली आहे. चालू वर्षी मे महिन्यात मॉन्सूनपूर्व दमदार पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामात काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहे. परंतु जूनपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे जवळपास सर्वच धरणे जूनपासून भरण्यास सुरुवात झाली होती. तर जुलैमध्ये अनेक धरणे भरून विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे..Pune Rainfall: इंदापुरात मुबलक, बारामतीत कमी हजेरी .यंदा जूनमध्ये सर्वाधिक पाऊस पडला असून सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी २४९.१ मिलिमीटर म्हणजेच १४१ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये मावळात सरासरीच्या २२४.६ मिलिमीटरपैकी ६९८.४ मिलिमीटर म्हणजेच ३१० टक्के पाऊस पडला. तर इंदापूर तालुक्यात सर्वांत कमी पाऊस पडला होता. जुलैमध्ये पावसाचे.प्रमाण कमी झाले असून सरासरीच्या ३०९.३ मिलिमीटरपैकी २३०.६ मिलिमीटर म्हणजेच ७४ टक्के पाऊस पडला. या महिन्यात जूनच्या तुलनेत कमी पाऊस पडला असल्याचे दिसून आले. यामध्ये मावळ तालुक्यात सरासरीच्या ४६८.२ मिलिमीटरपैकी ८५७.८ मिलिमीटर म्हणजेच १८३ टक्के पाऊस पडला होता..Pune Heavy Rainfall: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद.तर तर राजगड तालुक्यात सरासरीच्या ३६६.५ मिलिमीटरपैकी ३७३.५ मिलिमीटर म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडला. तर उर्वरित सर्वच तालुक्यांत १०० टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. जुन्नर तालुक्यात अवघा ३१ टक्के पाऊस पडला. ऑगस्टमध्ये काही प्रमाणात उशिराने चांगला पाऊस झाला असला तरी पावसाचे प्रमाण कमीच होते..जिल्ह्यात सरासरीच्या २२० मिलिमीटरपैकी १७७.१ मिलिमीटर म्हणजेच ८१ टक्के पाऊस पडला. तर मावळ तालुक्यात सर्वाधिक सरासरीच्या ३२१ मिलिमीटरपैकी ५७१.१ मिलिमीटर म्हणजेच १७८ टक्के पाऊस पडला. दौंड, खेड या तालुक्यांतही बऱ्यापैकी पाऊस पडला असून इतर तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी होते..Pune Rainfall: ताम्हिणी घाटात १९० मिलिमीटर पाऊस.मावळात धो धो पाऊसगेल्या तीन महिन्यांत मावळात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरीच्या १०१३.८ मिलिमीटरपैकी २१२७.३ मिलिमीटर म्हणजेच २०९ टक्के एवढा पाऊस पडला. या भागात डोंगराळ भाग अधिक असल्याने हा पाऊस पडला असल्याने या भागातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले..१ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पडलेला पाऊस, मिमीमध्येतालुका सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस टक्केमावळ १०१३.८ २१२७.३ २०९भोर ८४६ ९६२.२ ११३मुळशी १३८७.१ १३८२.५ ९९हवेली ५५५.५ ४५० ८१.वेल्हा २१३४ १८१४.८ ८५जुन्नर ३८०.४ ३०७.४ ८०खेड ४१०.७ ४७१.९ ११४आंबेगाव ५४२.५ ५६८ १०४शिरूर २२६.६ २३४.९ १०३.बारामती २०८.३ १६०.९८ ७७इंदापूर २६७.३ १८३.७ ६८दौंड २१४ २३२.६ १०८पुरंदर ३३०.६ २५६.४ ७७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.