Pune Weather Update: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता.३०) दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले होते. तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. पुणे शहर, उपनगरे आणि जिल्ह्यात गारांसह पाऊस झाला. झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली असून शेतकरी चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे..गेल्या काही दिवसांपासून वातावरणात वेगाने बदल होत आहे. दहा ते बारा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला होता. त्यानंतर पुन्हा जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात रविवारी (ता. २९) दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने आणि गारांच्या तडाख्याने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आणे व पेमदरा परिसरात सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत झालेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या नगदी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे..Unseasonal Rain: 'अवकाळी'सह गारपिटीचा तडाखा सुरुच, पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला झोडपले, कांदा, गहू पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेत.दुपारपर्यंत कडक ऊन आणि उकाडा जाणवत असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि त्यानंतर गारांसह पावसाची सुरुवात झाली. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरली आहे. पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून काही ठिकाणी ओढ्यांनाही पूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले..या वेळी अनेक शेतांमध्ये वाटाणा तोडणी आणि कांदा काढणीची कामे सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे काढलेला माल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. मात्र गारांचा मारा आणि साचलेल्या पाण्यामुळे वाटाणा आणि कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर साठवणुकीचा प्रश्न गंभीर बनला असून, ओलाव्यामुळे कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे..Unseasonal Rain: ऐन उन्हाळ्यात पुण्यात गारपीट व अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ.या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल विभागाने तातडीने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी आणे गावच्या सरपंच प्रियंका दाते, तसेच पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर यांनी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीअंतर्गत त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. .दरम्यान, पुढील काही दिवस हवामानात असेच बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक होणाऱ्या हवामान बदलामुळे शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.