Potato Farming: पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध जातींच्या बटाटा लागवडीचे प्रयोग करून कृषी क्षेत्रात नव्या शक्यता शोधल्या आहेत. शिमला आणि उटी येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कोडीत, सातगाव पठार आणि कुरवंडी येथील शेतांना भेट देऊन पिकांची उत्कृष्ट वाढ व व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केले.