Mahavitaran Electricity Theft Action: मागील पंधरा दिवसांत पुणे परिमंडलात धडक मोहीम राबवून १२८१ वीजचोरांवर कारवाई करून ८१ लाख ५५ हजारांचा दंड ठोठावला आहे. .या वीज चोरांनी तीन लाख ४० हजार ७३० युनिट वीज चोरी केल्याचा आरोप आहे. जे दंड भरणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे ‘महावितरण’ने सांगितले आहे..Electricity Bill Waiver: नाव शेतकऱ्यांचे फायदा महावितरणचा.भारतीय विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत कलम १३५ व १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार करून अथवा वीज यंत्रणेद्वारे थेट आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर ‘महावितरण’ कारवाई करत आहे. तसेच विजेचा वेगळ्या कारणांसाठी वापर केल्यास कलम १२६ अंतर्गत दंड ठोठावण्यात येत आहे..Agriculture Electricity Bill: वीजबिल माफीवरून आरोपांचा धुरळा.‘महावितरण’चे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी धडक मोहीम राबवून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी संपूर्ण परिमंडलात धडक मोहीम राबविली. या मोहिमेमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत..रास्तापेठ शहर मंडलात अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली १ ते १६ जुलै दरम्यान ३७५ ठिकाणी वीजचोरी आढळून आली. या वीजचोरांनी ९० हजार ७९९ युनिटची चोरी केली. त्यापोटी त्यांना २३ लाख ३० हजार ८८० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.