Pune Kharaif Sowing: पुणे विभागात १०९ टक्के पेरणी पूर्ण
Pune Agriculture: मे महिन्यापासून दमदार पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला लवकर सुरुवात केली. आतापर्यंत पुणे विभागात सरासरी १२ लाख ५६ हजार ४३९ हेक्टरपैकी १३ लाख ७० हजार ९३९ हेक्टर म्हणजेच १०९ टक्के पेरा पूर्ण झाला आहे.