यंदाच्या २०२५-२६ हंगामात एकूण १८५ कारखान्यांनी गाळप सुरु १५ डिसेंबरपर्यंत त्यांनी ३८१ लाख टन उसाचे गाळप३१९ लाख क्विंटल साखर उत्पादन पुणे विभाग ऊस गाळपात आघाडीवरकोल्हापूर विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वाधिक ९.७७ टक्के .Sugarcane Crushing Season:कोल्हापूर विभागात ४१ कारखाने असून त्यातील ३५ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला. त्यात २३ सहकारी १२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंत ८५.०७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. तर त्यातून ८३.१२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर कोल्हापूर विभागाचा साखर उतारा (Kolhapur sugar recovery) राज्यात सर्वाधिक ९.७७ टक्के एवढा आहे..साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या २०२५-२६ हंगामात एकूण १८५ कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे. १५ डिसेंबरपर्यंत त्यांनी ३८१ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून त्यांनी ३१९ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. राज्यातील सरासरी साखर उतारा ८.३६ टक्के एवढा आहे. कोल्हापूर पाठोपाठ पुणे विभागाचा उतारा ८.६३ टक्के आहे. पुणे विभागातील ३० कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे. त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक ९६.५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी ८३.२९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अमरावती विभागाचा उतारा ८.४५ टक्के तर नांदेड विभागाचा उतारा ८.०९ टक्के आहे. .Sugarcane Cultivation: सिंचनात वाढ अन् ऊस लागवडीला आला भर.बिद्री कारखान्याकडून १६ ते ३० नोव्हेंबरचे उसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमातसेच राज्यातील कारखान्यांनी नोव्हेंबरमध्ये गाळप केलेल्या ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान गाळप झालेल्या उसाची बिले जमा केली आहेत. प्रतिटन ३,६१४ रुपयांप्रमाणे बिलाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे यांनी दिली आहे..Sugarcane Production: गेल्या पाच वर्षांत देशात ऊस उत्पादनात वाढ.नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात कारखान्याने १ लाख ३० हजार ६३२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या उसाची संपूर्ण देय रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान कालावधीतील तोडणी आणि वाहतूक बिलेही अदा करण्यात येत असल्याचे फराकटे यांनी म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.