Purandar Cooperative Bank Success: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुरंदर तालुक्यात ७५ टक्के कर्ज वसुली करत २३ कोटी ६३ लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. दरम्यान, चालू खरीप हंगामासाठी आतापर्यंत ११ हजार ५५६ सभासदांना ११६ कोटी ३२ लाख रुपयांचे कर्जवाटप पूर्ण झाले असल्याची माहिती बँकेचे संचालक संजय जगताप यांनी दिली..जिल्हा बँकेच्या पुरंदर तालुक्यातील १३ शाखांमार्फत मागील आर्थिक वर्षात ३२४ कोटी ७१ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले होते. त्यापैकी २४३ कोटी ८५ लाख रुपयांची वसुली झाली आहे..Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बॅंकेला २०८ कोटींचा नफा.चालू खरीप हंगामासाठी तालुक्यातील ९७ संस्थांचे पीक कर्ज मंजूर झाले असून ५ एप्रिलपासून वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे. ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना प्राधान्याने कर्ज वाटप करण्याच्या सूचना जगताप यांनी सचिव व विकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या..Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल .सोमवारपर्यंत (ता. २०) तालुक्यातील १३ शाखांमधून ११६ कोटींचे वाटप झाले असून, ३० सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र सभासदांना कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या बैठकीस विभागीय अधिकारी महेश खैरे, किरण जाधव, अनिल उरवणे यांच्यासह विविध सोसायट्यांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते..ठेवीचे उद्दिष्ट पारजिल्हा बँकेने पुरंदर तालुक्यातील शाखांसाठी ३१ मार्च २०२६ अखेर ६४६ कोटी ठेवींचे उद्दिष्ट ठेवले होते. उद्दिष्टाचा हा टप्पा पार करीत पुरंदर तालुक्यातील १३ शाखांतून ७०४ कोटी ३३ लाख ९७ हजार रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.