Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांच्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ३१) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजली. तर विद्यमान अध्यक्ष अनिरुद्ध भोसले यांनी आगामी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर करत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले..आगामी निवडणुकीसाठी अमोल घुले, सौरभ कुंजीर आणि महेश शिर्के यांनी शड्डू ठोकला असून घुले आणि कुंजीर यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. तर अनिरुद्ध भोसले यांच्या पॅनेलकडून कुंजीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात आली..Pune APMC: बाजार समितीमध्ये स्वच्छता गृहाच्या घोटाळ्याला खतपाणी.दरम्यान गेल्या नऊ महिन्यांपासून मुदत संपली तरी अडते असोसिएशनची निवडणूक होत नव्हती. या बाबत अमोल घुले, विलास भुजबळ यांनी धर्मादाय आयुक्तांसह उच्च न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिल्यानंतर तातडीने वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती..वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अडते असोसिएशनच्या मनमानी कारभारामुळे व्यवसायाची दुरवस्था झाली. अडत व्यवसाय पूर्णपणे ढासळला असल्याचा आरोप ३२ मुद्द्यांवर फॅक्ट संस्थेचे अध्यक्ष किशोर कुंजीर यांच्यासह अडते असोसिएशनच्या काही सदस्यांनी केला आहे. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून वार्षिक सर्वसाधारण सभा घेतलेली नाही..Pune APMC : अडते असोसिएशनला उच्च न्यायालयाचा दणका.तसेच मुदत संपूनही निवडणुका झालेल्या नाहीत. संस्थेच्या शासकीय कामकाजात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, अपूर्णता आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे. हिशोबही प्रमाणित केलेले नाहीत. त्यामुळे अडत व्यवसाय सुमारे ८० टक्क्यांनी घटला आहे. व्यवसायवृद्धीसाठी गेल्या तीन वर्षांत अडते असोसिएशन पूर्णपणे अपयशी ठरली आहे. यावर वार्षिक सर्वसाधारण सभेत आरोप प्रत्यारोप झाले..कायदेसंमत अडत व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरीहित सर्वोच्च मानून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वर्तमान व्यवसायात खात्रीशीरपणे किमान ३०० टक्क्यांनी वाढ करता येईल, असा प्रस्ताव फॅक्ट इंडियाने डिसेंबर २०२४ मध्ये सादर केला होता. दुर्दैवाने अडते असोसिएशन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या प्रस्तावाबाबत सकारात्मक नसल्यामुळे शेतकऱ्यांचे तसेच सर्व अडत्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.- किशोर कुंजीर, अध्यक्ष, फेडरेशन फॉर अॅग्रो, कॉमर्स अॅण्ड ट्रेड.सर्व आरोप बिनबुडाचे काही जणांनी जाणून-बुजून अडते असोसिएशनची बदनामी करण्यासाठी आरोप केले आहेत. संघटनेने जबाबदारीने काम केले आहे म्हणूनच बाजार समितीचा सेस २२ कोटी रुपयांनी वाढलेला आहे. त्यातून व्यापारही वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच काम केले आहे.- अनिरुद्ध भोसले, अध्यक्ष, अडते असोसिएशन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.