Agriculture Department Update: भाडेकराराची मुदत संपल्यामुळे कृषी विभागाची ११ कार्यालये ऐन पावसाळ्यात स्थलांतराच्या संकटात सापडली आहेत. भाड्याच्या इमारतीतील कार्यालये तातडीने खाली करण्याच्या सूचना विभागानेच संबंधित कार्यालयांना दिल्याने प्रशासनासमोर नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत..राज्यातील विविध कृषी योजनांचे कामकाज पुण्यातील कृषी आयुक्तालयातून चालते. नवीन कृषी भवन उभारण्याच्या कामामुळे आयुक्तालयातील काही कार्यालये एरंडवणे येथील डीटीसी सेंटरच्या सहाव्या मजल्यावर भाडेतत्त्वावर स्थलांतरित करण्यात आली होती. या कार्यालयांसाठी दरमहा सुमारे ३८ लाख रुपये भाडे अदा केले जात असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत भाड्यापोटी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असून, आता शासनाने पुढील भाड्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास नकार दिल्याने भाडेकराराची मुदत वाढविण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली..Agriculture Department Infrastructure: सहायक कृषी अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यालय, गोदाम द्या.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने संबंधित कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात आत्मा संचालक, स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, लेखा विभागाचे सहायक संचालक, दक्षता पथकाचे अधीक्षक कृषी अधिकारी, संगणक प्रकल्प शाखेचे उपसंचालक, कृषी गणना उपायुक्त, नैसर्गिक शेती विभागाचे उपसंचालक, पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे आत्माचे प्रकल्प संचालक, पुणे उपविभागीय कृषी अधिकारी आणि पुणे तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयांचा समावेश आहे..नोटिशीनुसार, डीटीसी सेंटरमधील भाडेकराराची मुदत ५ जून २०२६ रोजी संपुष्टात आली असून, पर्यायी जागेत स्थलांतर करण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप स्थलांतर न झाल्याने संबंधित कार्यालयांनी तातडीने जागा खाली करावी, असे आदेश देण्यात आले आहेत..Agriculture Department Infrastructure: सहायक कृषी अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यालय, गोदाम द्या.दरम्यान, कृषी विभागाची कार्यालये महागड्या भाड्याच्या इमारतीत स्थलांतरित करण्याचा निर्णय कोणी घेतला, स्वतःच्या इमारतींमध्ये पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, भाडेकराराच्या नियोजनात कोणाची भूमिका होती आणि शासनावर पडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक भाराला जबाबदार कोण, असे प्रश्न विभागातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत..प्रसाधनगृहांचा पाणीपुरवठाही खंडितभाडेकरार संपुष्टात आल्यामुळे संबंधित कार्यालयांतील प्रसाधनगृहांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना शेजारील इमारतीतील प्रसाधनगृहांचा वापर करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे..डीटीसी सेंटरमधील खासगी जागेचा करारनामा संपला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या कार्यालयांची जागेची अडचण सोडवण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे. सध्याच्या जागेला मुदतवाढ मिळवणे, भाडेतत्त्वावर दुसऱ्या ठिकाणी जागा मिळवणे किंवा कृषी विभागाच्या इतर कार्यालयांमध्ये डीटीसीमधील कार्यालयांचे समायोजन करणे असे सर्व पर्याय गांभीर्याने विचारात घेतले जात आहेत. मात्र, डीटीसी जागेतील प्रसाधनगृहांचा बंद केलेला पाणीपुरवठा सध्या पूर्ववत झालेला आहे.- बाबासाहेब जेजुरकर, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.