Nagpur News: देशांतर्गत डाळ बाजारात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तेजीचा सूर उमटू लागला आहे. तूर आणि हरभरा या प्रमुख कडधान्यांची मागणी वाढल्याने आणि पुरवठा मर्यादित राहिल्याने बाजारात मजबुतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांत तुरीचे दर प्रति क्विंटल १०० ते २०० रुपयांनी वाढले असून, हरभऱ्यालाही चांगला आधार मिळत आहे..बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीची आवक अपेक्षेपेक्षा कमी आहे. शेतकऱ्यांकडून घटलेल्या दरांवर विक्रीचा दबाव नसल्याने आवक मर्यादित राहिली आहे. दुसरीकडे डाळ मिलर्स व साठेबाजांनी गरजेपुरती खरेदी सुरू ठेवल्याने बाजारात मागणी टिकून आहे. याचा थेट परिणाम तुरीच्या दरावर होत असून बाजारात देशी तुरीचे मजबुतीने व्यवहार होत आहेत. हरभरा बाजारातही हाच कल दिसून येत आहे..Pulse Market Crisis: आयातनिर्भर धोरण कडधान्यांच्या मुळावर.मागील काही आठवड्यांतील घसरणीनंतर आता हरभरा दरांमध्ये सुधारणा नोंदवली जात आहे. देशांतर्गत आवक नियंत्रित असून, आयात हरभऱ्याची उपलब्धताही मर्यादित आहे. आयात मालाची विक्री मंद गतीने होत असल्याने देशी हरभऱ्यावर अतिरिक्त दबाव निर्माण झालेला नाही. त्यामुळे हरभऱ्याच्या दरांना आधार मिळाल्याचे व्यापारी सांगतात. दिल्ली, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या प्रमुख बाजारांमध्ये हरभऱ्याचे दर २५ ते ५० रुपयांनी वधारले आहेत. देशी हरभऱ्याच्या मजबुतीचा परिणाम आयात हरभऱ्यावरही दिसून येत असून ऑस्ट्रेलिया, टांझानिया आणि कॅनडातून आलेल्या हरभऱ्याचे दरही सुधारले आहेत..Pulses Market : बाजारात आवक वाढल्याने डाळींच्या भावात घसरण .बाजार अभ्यासकांच्या मते, येत्या काही दिवसांत जर बाजार समित्यांमधील आवक वाढली नाही आणि डाळ मिलर्सची खरेदी कायम राहिली, तर तूर व हरभरा या दोन्ही कडधान्यांमध्ये सध्याची तेजी टिकून राहण्याची शक्यता आहे. मात्र, रब्बी हंगामातील हरभऱ्याची नवीन आवक सुरू झाल्यानंतर बाजाराचा कल कसा राहील याबाबत आताच भाष्य करणे योग्य राहणार नाही, असेही बाजार विश्लेषक सांगतात. सध्या तरी मर्यादित पुरवठा आणि सुधारलेली मागणी यामुळे कडधान्य बाजार शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिलासादायक ठरत असल्याचे चित्र आहे..प्रक्रिया उद्योजकांची वाढती मागणी आणि नव्या हंगामातील हरभरा आवक होण्यास अद्याप बराच कालावधी आहे. त्यामुळे हरभरा दरात सुधारणा अनुभवली जात आहे. नवा हरभरा बाजारात दाखल होताच दर हमीभावाच्या खाली जाण्याची भीती आहे. सध्या डॉलरच्या तुलने रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने आयात महागली आहे. त्याचा परिणाम तुरीच्या दरावर दिसून येत आहे.- विजय जावंधिया, शेतीमाल विपणन तज्ज्ञ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.