Buldhana News: देशाला कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ जाहीर केले आहे. अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख प्रति युनिट इतके अनुदान दिले जाणार आहे. इच्छुक वैयक्तिक अर्जदार, संस्था, महासंघ व शेतकरी बांधवांनी काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे..सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाची अंमलबजावणी राज्यात रब्बी हंगाम २०२५-२६ पासून सुरू झाली आहे.अभियानांतर्गत तूर, उडीद व मसूर या प्रमुख कडधान्य पिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून उत्पादनवाढीसोबतच मूल्यवर्धनावर भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने काढणीपश्चात पायाभूत सुविधा बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत आहे..Pulses Mission: शेतकऱ्यांना कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्याची संधी.सन २०२६-२७ या वर्षात काढणीपश्चात प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या घटकासाठी वैयक्तिक अर्जदार, शेतकरी उत्पादक संस्था , क्लस्टर स्तर महासंघ , प्राथमिक कृषी पतसंस्था तसेच महाराष्ट्रातील विविध कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत उपक्रम व संस्था पात्रराहतील..Pulses Mission: धोरणात्मक बदलाशिवाय कडधान्य मिशन कुचकामी .इच्छुक अर्जदारांनी काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही म्हटले आहे..अनुदानाची कमाल रक्कम २५ लाख रुपयेयोजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के, कमाल २५ लाख प्रति युनिट इतके अनुदान देय राहणार आहे. त्यामुळे कडधान्य प्रक्रिया, स्वच्छता, ग्रेडिंग, पॅकेजिंग आदी सुविधा उभारून स्थानिक स्तरावर मूल्यवर्धनाला चालना मिळणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.