Pulses Market: पावसाळा जवळ येऊ लागल्याने मुरबाड तालुक्यातील गृहिणींची कडधान्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. वाल, हरभरा, मूग, चवळी, मटकी आदी विविध कडधान्यांचा साठा करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यातच मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे..तालुक्यात पावसाळी भातशेतीनंतर कडधान्यांची पेरणी केली जाते. सध्या या पिकांची काढणी सुरू असून काही शेतकरी हरभरा व वाल विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये नव्या कडधान्यांची आवक वाढली आहे..Pulses Procurement: कडधान्यांची होणार १०० टक्के हमीभावाने खरेदी, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया?.पावसाळ्यात, विशेषतः श्रावण महिन्यात कडधान्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांना मोठी मागणी असते. त्या काळात बाजारात जाण्यापेक्षा उन्हाळ्यातच कडधान्ये खरेदी करून कडक उन्हात वाळवून साठवून ठेवण्याची गृहिणींची परंपरागत पद्धत आहे. यामुळे घरगुती साठा तयार होतो आणि पावसाळ्यातील गैरसोयी टाळता येतात. .Pulses Procurement: देशभरात ३७.३९ लाख टन हरभरा आणि मसूर खरेदीला मंजुरी!.एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर कडधान्य खरेदी होत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामात हरभरा ११० ते १३० रुपये किलो, वाल १५० ते १८० रुपये किलो, मूग १०० ते १२० रुपये किलो, तर चवळी सुमारे १५० रुपये किलो दराने विक्री होत आहे..मुरबाड तालुक्यात पूर्वी कडधान्य शेती मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र, मोकाट गुरांच्या त्रासामुळे गेल्या काही वर्षांत या शेतीला मर्यादा आल्या होत्या. सध्या ग्रामीण भागात गुरांची संख्या कमी होत असून, कडधान्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी पुन्हा या पिकांकडे वळू लागले आहेत. यामुळे स्थानिक उत्पादनातही वाढ होत असल्याचे दिसून येते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.