Groundwater Recharge: पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज असून जलव्यवस्थापन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून लोकचळवळ बनली पाहिजे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी जलतारासारखे उपक्रम राबवून भूजल पातळी वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा. जलसंवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे मत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले..जलसंपदा विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देणे आणि शाश्वत जलव्यवस्थापन उपाययोजनांना चालना देण्यासाठी आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते..Water Conservation: जलसंधारणातील साथीदार....जिल्हाधिकारी पुजार यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून समाजात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. विशेषतः दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी जलसंवर्धन उपक्रमांना प्राधान्य देत भूजल पातळी वाढविण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना सक्रिय सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. .Water Conservation: ऐंशीव्या वर्षीही पाणी प्रश्नाला भिडलेले खानापूरकर!.जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे यांनी ही मोहीम लोकाभिमुख असून समाजातील सर्व घटकांनी जलव्यवस्थापनासाठी सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता कल्याणी कालेकर यांनी जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच पाटबंधारे महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी विभाग मिशन मोडवर कार्यरत असल्याची माहिती दिली. धाराशिव पाटबंधारे मंडळामार्फत पंधरवड्यात राबविण्यात आलेल्या विविध कार्यशाळा व उपक्रमांची माहिती देणारी चित्रफीतही यावेळी सादर करण्यात आली. .सिना कोळेगाव प्रकल्प विभागाचे उपअभियंता चौघुले यांनी जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजनांसाठी शेतकरी, संस्था आणि संघटनांनी प्रत्यक्ष सहभागातून पुढाकार घेण्याचे आवाहन केले. जलसंवर्धन,पाणी बचत आणि शाश्वत जलनियोजनासाठी समाजात व्यापक जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा पंधरवडा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आला. कार्यक्रमास कार्यकारी अभियंता सलीम आवटे, अजित मदने यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जलदूत, जलप्रेमी व शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.