Chh. Sambhajinagar News : हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या बैठकीनंतर राज्य मंत्रिमंडळाची मराठवाड्यात बैठकच झाली नाही. यावर्षी तरी ती व्हावी, अशी मराठवाड्यातील जनतेची अपेक्षा आहे. .राज्यातील नेतृत्वाने या मागणीचा गंभीरपणे आणि कर्तव्याच्या भावनेतून विचार करावा, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे अध्यक्ष डॉ. संजय लाखेपाटील यांनी केली. छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ लाखे बोलत होते. डॉ. लाखे म्हणाले, की राज्य सरकारने ४ ऑक्टोबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. .Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार निर्णय; उपसा जलसिंचन योजनेसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ.या बैठकीत ४९ हजार २० कोटींच्या प्रकल्प मान्यता निधीची घोषणा झाली होती. त्या प्रकल्पाचे काय झाले याचीही माहिती मराठवाड्यातील जनतेला द्यावी. तसेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित बैठकीत मंजूर केलेल्या ४२ हजार २० कोटींच्या प्रकल्पाची व निधीची १०० टक्के तरतूद तातडीने करून ते प्रकल्प पूर्ण करावेत. .गेल्या दहा वर्षांतील (२०१४-२०२४) राज्यातील तिन्ही वैधानिक विभागातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र सगळ्या प्रकारच्या निधी, मंजुरी, सद्यःस्थिती तसेच राज्याच्या अंदाजपत्रकीय, अंदाजपत्रका बाहेरील, कर्जाऊ रक्कमेतून उभारलेले प्रकल्प, केंद्र सरकारचा निधी, मंजुरी प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढावी, अशी आग्रही मागणी डॉ. लाखे पाटील यांनी केली..Cabinet Meeting : श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी १ हजार रुपयांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबरला राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली नाही तर जालन्यासह ठिकठिकाणी हुतात्मा स्मारकासमोर लाक्षणिक उपोषण केले जातील. त्यासाठी मराठवाड्यातील विविध सामाजिक, विकास प्रिय संघटना, राजकीय पक्ष यांना सहभागी होण्यासाठी संपर्क साधून आवाहन केले जात आहे. .स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी जाहीर विनंतीही केल्याची माहिती डॉ. लाखे पाटील यांनी दिली. या पत्रकार परिषदेला मंचचे कार्याध्यक्ष सतीश पट्टेकर, जिल्हाध्यक्ष आनंद लोखंडे, दिनेश फलके, सुभाष कोळकर, शरद देशमुख, ज्ञानेश्वर कदम, राजेंद्र दाते पाटील, धनंजय देशमुख, शरद देशमुख, अविनाश वारकरी, राहुल लांडगे, दीपक डांगरे, सचिन दाभाडे, मनोज बोडे, आदींची उपस्थिती होती. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.