Pune News : दिवाळीत सर्वसामान्य नागरिकांना रास्त दरात उपलब्ध होणाऱ्या दि पूना मर्चंट्स चेंबरच्या लाडू, चिवडा उपक्रमाचे मंगळवारी (ता. १४) जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. .उपक्रमाचे यंदाचे ३८ वे वर्ष असून, या वर्षी २ लाख किलो विक्रीचे उद्दिष्ट असल्याचे चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सांगितले. गेल्या ३८ वर्षांपासून सर्वसामान्यांच्या पसंतीस ठरलेल्या चिवडा, लाडू विक्री २३ वितरण केंद्राद्वारे पिंपरी- चिंचवडसह शहरातील सर्व भागांत होणार आहे. .Agriculture Scheme : अतिवृष्टीबाधित शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ प्राधान्याने द्या .एक किलो आणि अर्धा किलो अशा आकर्षक पॅकिंगमध्ये लाडू, चिवडा उपलब्ध होईल. एक किलोचा दर १९०/- रुपये आणि अर्धा किलोचा दर १०० रुपये ठेवण्यात आला आहे. या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्ने घेतली आहे. .Agriculture Innovation: अमेरिकेतील फळबागेत ‘पीक युवर ओन’ उपक्रम.तसेच चेंबरच्या अमृत महोत्सवी वर्षात सदर उपक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस व इंडियाज वर्ल्ड रेकॉड्र्समध्ये नोंद झाली आहे. नुकतीच लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी सदर उपक्रमाची दखल घेतली असून, उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दि पूना मर्चंट्स चेंबरला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.