Latur News: लातूर जिल्ह्यातील वन्यजीव प्राण्यांच्या उपद्रवांमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असून त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. याची भरपाई म्हणून राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी भारतीय किसान संघाचे अखिल भारती जैविक शेती प्रमुख नानाजी आखरे यांनी शुक्रवारी (ता. सहा) पत्रकार परिषदेत केली. .वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी कुंपण योजना सुरू केली असली तरी त्याची तरतूद कमी आहे. या प्राण्यांचा सरकारनेच बंदोबस्त करावा अथवा शेतीला कुंपण करण्यासाठी योग्य ती मदत शेतकऱ्यांना करावी, अशी मागणीही आखरे यांनी केली आहे..Wildlife Crop Damage: शेतात हत्तींचा धुडगूस; पिकांचे मोठे नुकसान.संघाच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेण्यात आली. त्यात शेतीमालाला उत्पादन आधारित खर्चावर दीडपट अधिक भाव मिळाला पाहिजे, असा आग्रह धरण्यात आली. संघ ही देशभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करणारी पक्षविरहीत संघटना आहे. संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील ७० हजार गावांतून ग्रामसमिती नेमली असून त्या समितीमार्फत शेतकऱ्यांना जैविक शेतीसाठीचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे..Monkey Crop Damage: आजऱ्यात माकडांचा वाढला उपद्रव.संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला जातो. शेतकरी एकजुटीसाठी देशभर प्रयत्नशील असलेल्या या संघटनेने शेतकऱ्यांना सरकारने एफआरपीनुसार उसाला भाव जाहीर करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार सरकारने एफआरपी दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हाती काही पडत नाही..हमीभाव केंद्रे उशिरा सुरू होत असल्याने बाजारात शेतीमाल विकावा लागतो. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी भावांतर योजना सुरु करावी, अशी मागणी आखरे यांनी या वेळी केली. यावेळी संघाचे प्रांताध्यक्ष नवनाथ मद्दे, प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील, जिल्हाध्यक्ष तुकाराम येलाले, जिल्हा मंत्री सतीश देशपांडे तावशीकर, कोशाध्यक्ष शेखर मराठे व पदाधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.