Cashew MSP: काजूला प्रति किलो दोनशे रुपये हमीभाव द्या
Cashew Farmers: काजु बीच्या दरातील चढउतारामुळे जिल्ह्यातील काजू बागायतदार गेल्या काही वर्षांपासून हैराण झाले आहेत. त्यामुळे काजू बागायतदारांनी मागील दोन-तीन वर्षांपासून काजु बीच्या दराबाबत अनेकदा आंदोलने करत अनुदानाची मागणी केली.