Solapur News: ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सोमवारी (ता. २२) सिद्धेश्वर साखर कारखान्यासमोर आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. ऊसदर जाहीर होईपर्यंत गव्हाणीत ठिय्या मांडून गाळप बंद पाडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. .सिद्धेश्वर साखर कारखान्याने ऊस गाळपाला सुरवात करून महिना उलटला आहे. मात्र, अद्याप ऊसदर व पहिली उचल जाहीर केली नाही. शिवाय गाळप झालेल्या उसाचे बिलही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाही. ऊसदर जाहीर करण्यासह पहिली उचल प्रतिटन ३४०० रुपये द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोमवारी दुपारी एकपासून कारखान्यासमोर आंदोलन करणार आहे..Sugarcane Price: प्रतापगड कारखान्याचा प्रतिटन एकरकमी ३३५० रुपये दर.‘लोकमंगल’कडून उसाच्या नोंदीबीबीदारफळ (ता. उ. सोलापूर) येथील लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रीजने पुढील गाळप हंगाम म्हणजे २०२६-२७ साठी उसाच्या नोंदी घेण्यास सुरवात केली आहे. सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांच्या सर्व उसाची नोंद घेतली जात आहे. वेळेत नोंदणी करावी. यासाठी टाळाटाळ झाल्यास कारखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे..Sugarcane Price: दीड महिन्यानंतरही १२ साखर कारखान्यांकडून ऊसदर नाहीच.‘सिद्धनाथ’कडून २८०० रुपये ऊसदरतिऱ्हे येथील सिद्धनाथ शुगरने प्रतिटन दोन हजार ८०० रुपये ऊसदर जाहीर केला आहे. कारखान्याचे प्रकल्प व्यवस्थापक यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे संघटना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे..सिद्धेश्वर साखर कारखान्याने ऊसदर जाहीर करण्यासाठी १८ डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती; मात्र अद्याप ऊसदर जाहीर केला नाही. त्यामुळे सोमवारी गव्हाणीत ठिय्या मांडून गाळप बंद पाडण्यात येणार आहे. ऊसदर जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरू राहील.- विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.