Ahilyanagar News : अनेक वर्षांपासून मागणी असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. या रस्त्याने अनेकांचे बळी घेतले आहेत. राहुरी तालुक्याच्या हद्दीत अहिल्यानगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गावर जीवघेण्या खड्ड्यांमुळे मागील आठवड्यात चार निष्पाप प्रवासी बळी पडले. त्यामुळे बुधवारी लोकांनी आंदोलन करत संताप व्यक्त केला. त्याचा फटका जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनालाही बसला. .अहिल्यानगर-मनमाड हा शिर्डीला जोडणारा महामार्ग आहे. या रत्यावरुन शिर्डीला येणाऱ्या लाखो भाविकांसह धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव भागात जाणारी शेकडो वाहणे जातात. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने आणि अंतर्गत राजकीय वादात हा या रस्त्याचे काम होत नसल्याचा सातत्याने आरोप केले जात आहेत. .अगदी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनाही काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात हतबलता व्यक्त केली होती. रस्त्यावर पडलेलेल खड्डे आणि झालेल्या अवस्थेमुळे सातत्याने अपघात होत असून लोकांचे बळी जात आहेत..Nagar-Manmad Highway : रस्त्यासाठी किती अंत पाहणार?.मागील आठवडाभरात केवळ राहुरी तालुक्याच्या हद्दीत चार लोकांचा अपघाताने मृत्यू झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिक, प्रवाशांनी राहुरी फॅक्टरी येथे (बुधवारी) अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलन सुरु असताना शिर्डीच्या दिशेने रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या मोकळ्या रस्त्यावरून आलेले जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन संतप्त आंदोलकांनी अडविले. .पोलिसांनी तटबंदी करून वाहन छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणाकडे वळविले. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बोलावून आंदोलनाची माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाची झळ बसली. राष्ट्रीय महामार्ग विभागाबाबतही लोक संताप व्यक्त करत आहेत. .Nagar-Manmad Protest : रस्त्याचे काम सुरू; लंके यांचे उपोषण मागे.आंदोलन कर्त्यांना सामोरे जाणाऱ्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंग काढून घेत कनिष्ठ दर्जाचे अधिकारी पाठविल्यानेही लोकांनी संताप व्यक्त केला. अहिल्यानगर-कोपरगाव रस्त्याचा प्रश्न जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे १५ वर्षापासून प्रलंबित आहे. .भारत कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्याच्या कामाची ७०० कोटींची निविदा २७ टक्के कमी दराने घेतली आहे. यापूर्वीही कमी दराने निविदा घेऊन तीन ठेकेदार अर्धवट काम करून पळून गेले आहेत. त्यामुळे कामाविषयी साशंकता आहे असे रस्ता दुरुस्ती कृषी समितीने आरोप केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.