Crop care in Summer: काही दिवसांत उन्हाळ्याला सुरुवात होणार असून, हवामानातील बदलांमुळे उन्हाची तीव्रताही दरवर्षी वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत फळबागांचे योग्य संरक्षण व देखभाल करणे फार महत्त्वाचे ठरते. यासाठी अनेक भागांत क्रॉप कव्हर म्हणजे आच्छादन वापरले जाते. यामुळे बागेतील तापमान व आर्द्रता नियंत्रित राहते, पिकांना उष्णतेचा ताण कमी बसतो आणि फळांचे नुकसान टाळून दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते..फायदेक्रॉप कव्हर झाडाभोवती एक सुरक्षित कवच तयार करते, ज्यामुळे मिनी ग्रीन हाउस इफेक्ट झाडांना मिळतो.क्रॉप कव्हरचा वापर केल्याने पिकांना अनेक प्रकारे संरक्षण मिळते.उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले की पिकांना उन्हाचे चटके म्हणजे सनबर्न होते. मात्र क्रॉप कव्हरमुळे ही तीव्रता कमी होते आणि झाडे सुरक्षित राहतात.तसेच मावा, पांढरी माशी, फुलकिडे, पक्षी व इतर हानिकारक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, त्यामुळे कीटकनाशकांचा वापर आणि खर्च दोन्ही ४० ते ५० टक्क्यांनी कमी होतात..Fruit Protection: फळबागेमध्ये फ्रूट कव्हर, फॅब्रिक कव्हरचा वापर .झाडाची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे झाड हिरवेगार राहते आणि फळांची सेटिंग चांगली होते.क्रॉप कव्हरमुळे जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे जमीन जास्त काळ ओलसर राहते आणि सिंचनाची गरजही घटते.सावलीत वाढ झाल्यामुळे फळे व भाजीपाला अधिक चकचकीत, आकाराने चांगले आणि रंगाने आकर्षक होतात, ज्यामुळे बाजारात चांगला दर मिळतो.याशिवाय गारपीट, जोरदार वारा आणि मुसळधार पावसाचे थेंब थेट पिकांवर पडत नसल्याने पिकांचे नुकसान टाळता येते आणि उत्पादन सुरक्षित राहते.फॅब्रिक कव्हरची टिकाऊक्षमता चांगली असल्यामुळे ३-४ हंगामात ते सहज वापरता येते..प्रकारक्रॉप कव्हरचे २ मुख्य प्रकार असतात. ज्यामध्ये प्लास्टिक कव्हर आणि फॅब्रिक कव्हर हे दोन प्रकार येतात.१. फॅब्रिक कव्हरहे हलके आणि पांढऱ्या रंगाचे कापड असून ते पिकांना थेट उन्हापासून जास्त संरक्षण देते. या कव्हरमुळे जमिनीतला ओलावा टिकून राहतो, बाष्पीभवन कमी होते आणि सिंचनाची गरजही कमी पडते. उन्हाळी हंगामात याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मावा, पांढरी माशी, फुलकिडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हे कव्हर विशेष उपयुक्त ठरते.२. प्लास्टिक कव्हरहे सहसा पॉलिथिन फिल्मपासून बनवलेले असते. हे सलग म्हणजे बिना छिद्रांचे असते, म्हणजे हवा किंवा पाणी यातून आरपार जाऊ शकत नाही. त्यामुळे खाली जास्त उष्णता आणि आर्द्रता निर्माण होते..वापरद्राक्ष, डाळिंब, ढोबळी मिरची, केळी, काकडी, टरबूज आणि इतर भाजीपाला पिकांवर याचा वापर केला जातो.खर्चक्रॉप कव्हरमध्ये गुंतवणूक सुरुवातीला महाग वाटू शकते, परंतु त्याचे फायदे, टिकाऊपणा आणि वाढणारे उत्पादन यामुळे ही गुंतवणूक दीर्घ काळासाठी फायदेशीर ठरते.हे कव्हर कृषि सेवा केंद्रांमध्ये, दुकानात तसेच ऑनलाईन उपलब्ध होऊ शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.