Jalna News: मानवाच्या आरोग्यासाठी जमिनीचे आरोग्य जपा, असा सल्ला प्रगतिशील शेतकरी गणेशराव नानोटे यांनी दिला. जागतिक मृदा दिन व कृषी विज्ञान मंडळाचे मासिक चर्चासत्र निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात श्री. नानोटे बोलत होते..या वेळी जालना कृषी विभागाचे उपसंचालक संजय कायंदे, जिल्हा मृद् सर्व्हेक्षण व मृद् चाचणी अधिकारी प्रदीप बैनाडे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालनाचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भुजंग रिठे, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. एन. आर. पतंगे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण भगवानराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती..Soil Health: मातीला बनवूया सक्षम.श्री. नानोटे म्हणाले, की आधुनिक शेती करतांना निविष्ठांच्या वापरासोबत जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे ही काळाची गरज असून शेतकऱ्यांनी पीक उत्पादनामध्ये सातत्य ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. अध्यक्षीय भाषणात मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण श्री काळे यांनी त्यांच्या शेतीचे अनुभव विषद केले.कृषी विभाग जालना येथील उपसंचालक संजय कायंदे यांनी रासायनिक खतांच्या उपयोगीतेसाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे तरच उत्पादन खर्चात बचत करता येईल, असे सांगितले..या प्रसंगी कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. एन. आर. पतंगे यांनी तूर पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये कीड व्यवस्थापनाच्या भौतिक, जैविक व रासायनिक या पद्धतींचा योग्य प्रकारे वापर केल्यास उत्पन्नखर्चात बचत होईल असे सांगितले..Soil Health: शाश्वत माती अन् शेती व्यवस्थापन.कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी प्रास्ताविक करतांना मृदा दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्रातील माती परीक्षणाच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी केले तर आभार जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रदीप बैनाडे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी व महिला यांची उपस्थिती होती..चार शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरवया प्रसंगी जागतिक मृद दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्रा मार्फत तपासण्यात आलेल्या मृद नमुन्यांच्या विष्लेशणामध्ये सर्वाधिक सेंद्रिय कर्ब असणाऱ्या ४ शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये घेटुळी, ता.जालना येथील ओंकार मोहिते यांच्या शेताचा सेंद्रिय कर्ब ०.८० टक्के आढळून आला तर वानडगाव, ता. जालना येथील विजयमाला विठ्ठल नागवे यांच्या शेताचा सेंद्रिय कर्ब ०.६८ टक्के आढळून आला तर वानडगाव, ता. जालना येथील कुंता लहुराव नागवे व जवसगाव ता. बदनापूर येथील विठ्ठल बाबासाहेब गारखेडे यांच्या शेताचा सेंद्रिय कर्ब ०.६० टक्के आढळून आला. या वेळेस आरोग्य पत्रिका अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.