Chhatrapati Sambhajinagar News: गतवर्षी पावसाळ्याच्या अगोदरच मोठा पाऊस पडला. ऐन पावसाळ्यात राज्यभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन पूर आला होता. याचा फटका शेतकऱ्यांसह मच्छीमारांनाही बसला. .त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांनाही मदत मिळावी, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने ३७ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावासाठी राज्य सरकारकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो, याकडे आता लक्ष लागून आहे..Fishermen Rights: मच्छिमारांना शेतकरी दर्जा मिळाला, पण जमीन खरेदीचा हक्क नाकारला.मराठवाडा म्हटले, की दुष्काळ समोर येतो. परंतु, आजवर नद्यांचे पात्र भरलेल्या ठिकाणीही मागील वर्षी आजूबाजूची अनेक एकर जमीनही अक्षरशः वाहून गेल्याचे चित्र होते. जून ते ऑक्टोबरदरम्यान सरासरीच्या १४० टक्के पाऊस झाला. १ हजार मिलिमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. एक मंडळात तर तीन-तीन वेळा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने केवळ शेती पिकांचेच नाही तर मच्छीमारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले..Fishermen Rescue from Pakistan : पाकिस्तानातून २०० मच्छीमारांची सुटका.मत्स्यबीजही गेले होते वाहूनअतिवृष्टीने अनेक तलाव, नाले फुटून गेल्याने तळ्यात टाकलेले मत्स्यबीज वाहून गेले होते. काही ठिकाणी मच्छीमारांच्या बोटी वाहून गेल्या तर काही ठिकाणी दगडावर आदळून फुटून गेल्या. राज्य शासनाने मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांना मदत करावी, अशी मागणी करण्यात आली होती. .या मागणीच्या अनुषंगाने मत्स्योद्योग मंत्री नितीन राणे यांनी छत्रपती संभाजीनगरात बैठक घेऊन विभागातील सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पंचनामे करून नुकसानीचा आकाडा निश्चित केला आहे.नुकसानीची माहिती विभागीय प्रशासनाला कळविली असून त्यांनी मच्छीमारांच्या मदतीसाठी ३७ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे नोंदविली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.