सचिन पाटील, सौ. मोहिनी गायकवाड, डॉ. अ. द. कडलगआपल्याकडे उपलब्ध असणारे पाणी, मोटार व पंपसेट, ओलिताखाली आणावयाचे क्षेत्र, पिकाचा प्रकार, शेताचा उंच सखलपणा आदी गोष्टींचा विचार करून योग्य ठिबक सिंचन पद्धतींची निवड करावी.त्यादृष्टीने उपलब्ध सिंचन पद्धतींचा बारकाईने अभ्यास करावा. शेतात सर्वत्र समप्रमाणात पाणी मिळण्यासाठी योग्य आराखडा महत्त्वाचा असतो..जमिनीची प्रत, पिकाचा प्रकार, पिकाचे वय व मुळांची वाढ, पीक वाढीचा हंगाम, जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन, पानांद्वारे होणारे उत्सर्जन, जमिनीची खोली व पाणी धारण क्षमता याचा विचार करून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता त्याच्या आराखड्यावर अवलंबून असते. यासाठी खालील बाबी लक्षात घेणे जरुरीचे आहे..Sugarcane Drip Irrigation : असा करा उसासाठी ठिबकचा वापर ; मिळणार भरपूर उत्पादन .पाणी गाळप यंत्रणा व कार्यक्षमताठिबक संचासाठी आवश्यक दाबदाब नियंत्रणाची सोयदाब व प्रवाह यांचा परस्पर संबंधरासायनिक द्रावणाने क्षार व खनिज पदार्थ धुऊन काढण्याची प्रक्रिया.ऊस शेतीसाठी खालील ठिबक सिंचनजमिनीच्या पृष्ठभागावरील ठिबक सिंचन पद्धती : या पद्धतीत लॅटरलवर किंवा लॅटरलच्या आत बसविलेले दाब नियंत्रण असणारे किंवा दाब नियंत्रण नसणारे ड्रिपर्स बसविलेल्या पद्धतींचा समावेश होतो.जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धती : या पद्धतीत लॅटरलचे आत दाब नियंत्रण नसणारे अथवा असणारे ड्रीपर्स असणाऱ्या पद्धतींचा समावेश होतो..Sugarcane Drip Irrigation : उसाला ठिबक सिंचनाने पाणी देताना कोणती काळजी घ्याल? .ठिबक सिंचन पद्धतीतील प्रमुख घटकमोटार पंपसेटओलिताखाली असणारे क्षेत्र आणि त्याची पाण्याची गरज या गोष्टींचा विचार करून मोटार, पंपसेटची निवड करावी.उपलब्ध मोटार व पंपसेट ठिबक सिंचनासाठी योग्य असल्यास त्याचा वापर करून सुद्धा भिजणाऱ्या क्षेत्राची निश्चिती करता येते..फिल्टरठिबक सिंचन पद्धतीतील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विहिरी किंवा कॅनॉलचे पाणी वापरात असल्यास त्याबरोबर येणारे मातीचे कण, कचरा, घाण यामुळे ठिबकच्या तोट्या बंद अथवा नादुरुस्त होण्याची शक्यता असते. परंतु फिल्टर व्यवस्था वापरल्यास हा धोका टाळता येतो.यामध्ये दोन प्रकारचे फिल्टर असतात. एक वाळू वापरलेली गाळणी म्हणजेच सँड फिल्टर व दुसरा जाळीदार अथवा डिस्क फिल्टर असतो. दोन्ही फिल्टरमध्ये अडकलेली घाण काढून टाकण्यासाठी फिल्टरची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक असते. ठिबक संच सुरळीतपणे चालण्यासाठी फिल्टर व्यवस्था कार्यक्षम असणे महत्त्वाचे असते..Drip Irrigation for Sugarcane: खोडवा उसासाठी ठिबकद्वारे पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन.मुख्य वाहिनीपंपसेटपासून उपवाहिनीला पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्यवाहिनीचा उपयोग होतो. या वाहिन्या पीव्हीसी मटेरियलच्या असतात. या वाहिनीची निवड करताना पिकाला लागणाऱ्या पाण्याची गरज, पाण्याचा दाब व पाणी किती अंतरावर न्यावयाचे आहे ते अंतर या गोष्टींचा विचार करून मुख्य वाहिनीची निवड करावी. ही वाहिनी जमिनीखाली गाडणे महत्त्वाचे असते अन्यथा त्यावर परिणाम होऊन पाइप लवकर खराब होतात.उपमुख्य वाहिनीउपमुख्य वाहिनी मुख्य वाहिनीपासून लॅटरलला पाणीपुरवठा करते. ही वाहिनीसुद्धा पीव्हीसी मटेरियलपासून बनविलेली असते..लॅटरलनळ्यांचे एक तोंड उपमुख्य वाहिनीवर जोडलेले असते तर दुसरे तोंड बंद असते. लॅटरल एलएलडीपीई मटेरियलच्या बनविलेल्या असतात. या नळीवर किंवा नळीच्या अंतर्भागात ड्रीपर्स बसविलेले असतात.ड्रीपरलॅटरल पाइपवर अथवा पाइपच्या अंतर्भागात दाब नियंत्रण असणारे अथवा नसणारे ड्रीपर्स बसविलेले असतात..Drip Irrigation Projects : सूक्ष्म सिंचनच्या प्रस्तावांना पूर्वसंमतीची प्रतीक्षा.नियंत्रण झडपाएकाच मुख्य वाहिनीवरून अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत असल्यास आणि एका वेळेस एका ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी नियंत्रण झडपांचा वापर केला जातो.खत संयंत्रव्हेंच्युरी, खत टाकी अथवा फर्टिलायझर इंजेक्शन पंप या खत संयंत्राद्वारे ठिबक सिंचन पद्धतीतून पिकाच्या मुळाजवळ पाण्यात विरघळणारी खते दिली जातात.व्हेंच्युरी व इंजेक्शन पंपाचा वापर आम्ल किंवा क्लोरीन प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा करता येतो..ठिबक सिंचन पद्धतीची निवडआपल्याकडे उपलब्ध असणारे पाणी, मोटार व पंपसेट, ओलिताखाली आणावयाचे क्षेत्र, पिकाचा प्रकार, शेताचा उंच सखलपणा आदी गोष्टींचा विचार करून योग्य ठिबक सिंचन पद्धतींची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने उपलब्ध सिंचन पद्धतींचा बारकाईने अभ्यास करावा.शेतात सर्वत्र समप्रमाणात पाणी मिळण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचनाचा योग्य आराखडा महत्त्वाचा असतो..Drip Irrigation: ठिबक अनुदान वाटपाची सध्याची प्रणाली दर्जाहीन.पृष्ठभागावरील ठिबक सिंचन पद्धतीत लॅटरलवर बसविलेल्या तोट्यांद्वारे पाणी दिले जाते. जमिनीच्या उताराचा विचार करून दाब नियंत्रण असणाऱ्या किंवा नसणाऱ्या तोट्यांचा योग्य वापर केल्यास समप्रमाणात पाणी बसण्यास व पर्यायाने खत सर्वत्र सारख्या प्रमाणात बसण्यास मदत होते.पृष्ठभागांतर्गत वापरल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन पद्धतीमध्ये जमिनीच्या पृष्ठभागात लॅटरल नळ्या पसरवून पाणी दिले जाते. पाणी जमिनीच्या अंतर्भागात दिले जात असल्यामुळे बाष्पीभवनाद्वारे वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होऊन उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो. सदर पद्धती वापरताना फिल्टर व्यवस्था अत्यंत कार्यक्षम असावी लागते. ही पद्धती जमिनीच्या खाली ४ ते ६ इंच गाडलेली असल्यामुळे पाणी व खत पिकाच्या मुळांच्या सान्निध्यात मिळते. पाण्याचा आणि खताचा कार्यक्षमतेने वापर होतो..ठिबक सिंचन गुणवत्ता तपासणीठिबक सिंचन संचाची निवड करताना संच आयएसआय मार्क दर्जाचा संच निवडल्यास जास्त कालावधीसाठी कार्यरत राहतो.आपल्याकडील संच योग्य गुणवत्तेचा आहे किंवा नाही याची तपासणी भारतीय मानकानुसार करता येते..Drip Irrigation: पाणी टंचाईच्या काळात ठिबक सिंचन फायदेशीर, जाणून घ्या ठिबक सिंचनाचे फायदे.ऊस लागवड पद्धतीशेतीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करताना ऊस लागवडीची जोड ओळ पट्टा पद्धती किंवा जास्त अंतरावरील एक ओळ पद्धतीचा वापर केला जातो. जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजेच काळीभोर भारी जमिनीत ३ फूट ते ६ फूट व मध्यम जमिनीत २.५ फूट ते ५ फूट जोडओळ पट्टा पद्धतीने लागवड केल्यास आवश्यक प्रमाणात पाणी प्रसार मिळतो.दोन ओळींसाठी एक लॅटरल पाइपद्वारे पाणीपुरवठा करता येतो. तसेच जास्त अंतरावरील (५ ते ६ फूट) पद्धतीत ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास प्रत्येक ओळीस एक लॅटरल पाइप टाकावी लागते..ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांचा वापररासायनिक खतांचे त्यातील मुख्य अन्नद्रव्यानुसार नत्रयुक्त, स्फुरदयुक्त व पालाशयुक्त खते असे वर्गीकरण होते. ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी किंवा द्रवरूप खते वापरता येतात. ही खते हाताळण्यासाठी सोपी व शेतकऱ्यांना किमतीने परवडणारी असणे जरुरीचे आहे.खतांची मात्रा ही जमिनीचा प्रकार, त्यातील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, पीक वाढीच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन ठरविता येते..वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ठिबक सिंचनाद्वारे खतांच्या वापराबाबतच्या संशोधनावरून असे दिसून आले, की पाण्यात विरघळणारी अथवा द्रवरूप खते ठिबक सिंचनातून ऊस पिकास दिली असता खताच्या मात्रेमध्ये ३० टक्क्यांपर्यंत बचत करता येते.जमिनीतील ओलाव्यात आणि पिकांच्या मुळांजवळ मूलद्रव्ये दिल्याने त्यांची उपलब्धता वाढते. दिलेल्या खतांचा पीक वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर होतो. खते देण्याच्या मजुरीमध्ये आणि ऊर्जेत बचत होते.पीक वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यक तेवढे एक किंवा अनेक अन्नद्रव्ये पिकांच्या मुळाशी देणे शक्य होते.उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ आणि ३५ ते ५५ टक्क्यांपर्यंत पाण्यात बचत होते.रान बांधणीची आवश्यकता नाही. जमीन सपाटीकरणाची आवश्यकता नसते.- सचिन पाटील ९९२३१३४००५(कृषी अभियांत्रिकी विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.