Nagpur News: देशातील वस्त्रोद्योगासाठी पर्यायी तसेच व्यावसायिक नैसर्गिक फायबर म्हणून मिल्कवीड (Milkweed) पिकाला चालना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात देशातील चार राज्यांमध्ये प्रत्येकी सरासरी १०० एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर मिल्कवीडची लागवड केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरिराज सिंग यांनी रविवारी (ता. १८) नागपूर दौऱ्यात दिली..गिरीराज सिंग म्हणाले, की पर्यावरणपूरक आणि टिकाऊ वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने मिल्कवीड हा फायबर क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवू शकणारा पर्याय आहे. कापूस व कृत्रिम फायबरवरील वाढता ताण लक्षात घेता, नैसर्गिक व कमी पाण्यात येणाऱ्या पिकांकडे वळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मिल्कवीड महत्त्वाची भूमिका बजावू शकतो..Rabi Crop Competition: हिंगोलीत शासनाच्या पीक स्पर्धेला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद; प्रयोगशील शेतीचा बोजवारा.या उपक्रमासाठी नॉर्थ इंडिया टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन (एनआयटीआरए) ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. तिच्या माध्यमातून अनुदानावर प्रायोगिक लागवड राबविली जाणार असून, पहिल्या टप्प्यात ओडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हा प्रयोग होणार आहे..‘एनआयटीआरए’च्या मुख्यालयात व संलग्न केंद्रांमध्ये गेल्या १२ वर्षांपासून मिल्कवीडवर संशोधन सुरू असून, या पिकापासून दीर्घकाळ उत्पादन मिळते, हे प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे. मिल्कवीडपासून मिळणारे फायबर हलके, उष्णतारोधक आणि जैवविघटनशील असल्याने त्याचा वापर वस्त्रनिर्मिती, गादी, उशी, जॅकेट्स तसेच औद्योगिक फिल्टरमध्ये होऊ शकतो. एकदा लागवड केल्यानंतर अनेक वर्षे उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा कमी खर्चात व स्थिर उत्पन्न देणारा पर्याय ठरू शकतो..Rabi Wheat Crop: पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखावला, गव्हाचं बंपर उत्पादन शक्य.याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फांदी सहा इंच किंवा एक फुटावरून कापल्यास अधिक उपफांद्या मिळतात. प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांना हा पर्याय व्यावसायिक स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा मानस असल्याचेही मंत्री सिंग यांनी स्पष्ट केले. फ्लेक्स (लिनेन), रॅमीफायबर, नॅचरल बांबू फायबर, ज्यूट यांसारखे फायबर क्षेत्रातील पर्याय देखील दृष्टिक्षेपात असल्याचे त्यांनी सांगितले..मिल्कवीड पिकाविषयी शास्त्रीय माहितीशास्त्रीय नाव : ॲसक्लेपीॲस एसपीपीकुटुंब : ॲपोसायनासीई (Apocynaceae)हवामान : कोरडे ते मध्यम पर्जन्यमान; उष्ण व अर्ध-उष्ण प्रदेशात अनुकूलमाती : हलकी ते मध्यम, निचऱ्याची जमीन; कमी सुपीक जमिनीतही तग धरण्याची क्षमतापाणी गरज : अत्यल्प; दुष्काळसदृश परिस्थितीतही वाढ.आयुष्य : बहुवर्षायू (एकदा लागवड केल्यावर अनेक वर्षे उत्पादन)उत्पादन घटक : शेंगा व त्यातील रेशीमसदृश फायबरफायबरचे गुणधर्म : अतिशय हलके, उष्णतारोधक, जैवविघटनशील व पर्यावरणपूरकवापर : वस्त्रोद्योग, उशी-गादी, थंडीपासून संरक्षणात्मक वस्त्रे, औद्योगिक फिल्टर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.