National Loss: देशाने विमान आणि हेलिकॉप्टर अपघातांमध्ये आतापर्यंत अनेक बडे नेते गमावले आहेत. संजय गांधी, माधवराव शिंदे, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी, लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष जी. एम. सी बालयोगी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी आदी बड्या नेत्यांचा मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये समावेश आहे. .बलवंतराय मेहता१९ सप्टेंबर १९६५ : गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले मेहता हे १९६५ च्या युद्धादरम्यान कच्छच्या रणात निरीक्षणासाठी विमानातून उड्डाण करत होते. त्याचवेळी पाकिस्तानने त्यांचे विमान पाडले. या दुर्घटनेत मेहता, त्यांची पत्नी, तीन कर्मचारी, एक पत्रकार आणि दोन क्रू सदस्यांचा मृत्यू झाला..संजय गांधी२३ जून १९८० : काँग्रेसचे बडे नेते असलेल्या संजय गांधी यांना विमान उड्डाणाचा छंद होता. २३ जून रोजी ते दिल्लीमध्ये स्वतः विमान उडवीत असताना त्यांच्या विमानाला मोठा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला होता..माधवराव शिंदे३० सप्टेंबर २००१ : काँग्रेसचे तत्कालीन दिग्गज नेते असलेले माधवराव शिंदे यांचे उत्तर प्रदेशातील विमान अपघातामध्ये निधन झाले होते. शिंदे हे प्रचारसभेसाठी कानपूरला जात होते. या वेळी शिंदेंसमवेत सहा जण त्या विमानातून प्रवास करत होते..Ajit Pawar Passes Away: राज ठाकरेंची अजित पवारांवर भावनिक पोस्ट; "महाराष्ट्राने उमदा आणि स्पष्टवक्ता नेते गमावला".जी. एम. सी. बालयोगी३ मार्च २००२ : लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. जी.एम.सी. बालयोगी यांच्या हेलिकॉप्टरला आंध्र प्रदेशातच अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्यांचे निधन झाले होते. ज्या वेळी हा अपघात घडला त्या वेळी बालयोगी हे ‘तेलुगू देसम’चे सदस्य होते..सिप्रियान संगमा२२ सप्टेंबर २००४ : मेघालयचे ग्रामविकासमंत्री असलेल्या सिप्रियान संगमा यांच्यासह नऊ जणांना गुवाहाटीहून शिलाँगच्या दिशेने घेऊन जाणारे ‘पवनहंस’ कंपनीचे हेलिकॉप्टर बारापानी तलावाजवळ कोसळले होते. या दुर्घटनेमध्ये संगमा यांच्यासह नऊ जणांचा मृत्यू झाला होता..ओ. पी. जिंदाल आणि सुरेंद्रसिंह३१ मार्च २००५ : उद्योगपती आणि हरियानाचे मंत्री असलेल्या ओमप्रकाश जिंदाल यांचेही हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाले होते. याच अपघातामध्ये त्यांच्यासमवेत कृषिमंत्री सुरेंद्रसिंह यांचाही मृत्यू झाला होता. या दोघांना चंडीगडहून दिल्लीच्या दिशेने घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उत्तर प्रदेशातील सहारनपूरनजीक कोसळले होते..Ajit Pawar Death: 'दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला'; मुख्यमंत्री फडणवीसांकडून भावना व्यक्त, तीन दिवसांचा दुखवटा जाहीर .राजशेखर रेड्डी२ सप्टेंबर २००९ : आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनाही हेलिकॉप्टर अपघातामध्ये प्राण गमवावे लागले होते. रेड्डी हे हेलिकॉप्टरमधून बेगमपेटहून चित्तूर जिल्ह्यातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. पुढे त्यांचे हेलिकॉप्टर अचानक रडारवरून गायब झाले; दुसऱ्या दिवशी येथील जंगलामध्ये अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष आढळून आले होते..दोरजी खांडू३० एप्रिल २०११ : अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या दोरजी खांडू यांच्यासह चौघाजणांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला होता. खांडू हे तवांगहून इटानगरच्या दिशेने जात असताना पश्चिम कामेंग जिल्ह्यामध्ये त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते..सरसेनाध्यक्ष बिपिन रावत८ डिसेंबर २०२१ : देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष असलेल्या जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाले होते. तमिळनाडूतील कुन्नूरनजीक ही दुर्घटना घडली होती. रावत हे त्यांची पत्नी आणि अन्य अकरा जणांसह सुलूरहून वेलिंग्टनच्या दिशेने जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते..विजय रूपानी१२ जून २०२५ ः अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जाणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामध्ये २४२ पेक्षाही अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश होता. उड्डाणानंतर काही सेकंदांमध्ये हे विमान कोसळले होते.हवाई अपघातात हे देखील मृत्युमुखीशास्त्रज्ञ होमी भाभा (१९६६)अभिनेत्री के. एस. सौमय्या (२००४).आता चौकशी करावी : ममता बॅनर्जीकोलकता (वृत्तसंस्था) ः ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी,’ अशी आग्रही मागणी करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याचा संबंध राजकारणाशी जोडला आहे. ममतांनी याबाबत काही शंकाही उपस्थित केल्या आहेत. ‘सर्वसामान्य लोक दूरच पण या देशातील राजकीय नेतेही सुरक्षित राहिलेले नाहीत,’ अशा भावना ममतांनी व्यक्त केल्या आहेत. त्या येथे जाहीर कार्यक्रमामध्ये बोलत होत्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.