Agriculture Management:शेतकरी नियोजनपीक : आलेशेतकरी : सुरेश बाजीराव मानेगाव : काशीळ, ता. जि. साताराएकूण क्षेत्र : पाच एकरआले लागवड : एक एकर.काशीळ (ता. जि. सातारा) येथील सुरेश बाजीराव माने हे प्रगतशील शेतकरी आहेत. अत्यंत नियोजनपूर्वक आल्याची शेती करत योग्य अर्थार्जन मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांनी अजिंक्यतारा कारखान्यांत नोकरी करत शेतीची आवड जपली. आता ते सेवानिवृत्त झाले असून पूर्णवेळ शेती करत आहेत. त्यांची पाच एकर शेती आहे. त्यात ऊस, सोयाबीन या पिकांसह किमान एक एकरांत मागील पंधरा वर्षांपासून आले लागवड केली जात आहे.ऊस, सोयाबीन, हिरवळीची खते, जमिनीला विश्रांती देण्यासाठी पीक फेरपालट व मिरचीचे आंतरपीक ही त्यांच्या शेतीची वैशिष्ट्ये आहेत. किमान रासायनिक निविष्ठांचा वापर करून पीक निरीक्षण करून रासायनिक फवारण्या करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच आले लागवडीत एकरी उत्पादकता व गुणवत्तेत सातत्य राखण्यात सुरेश माने यशस्वी झाले आहेत. बाजारभावाचा विचार करून दर्जेदार आल्याची विक्री करण्यावर त्यांचा भर असतो..Ginger Farming: सातारा जिल्ह्यात आले लागवड सुरु.जमिनीची निवडआले लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करण्यास प्राधान्य दिले जाते. कारण उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेले कंद शेतात पाणी साचून राहिल्यास खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये आले लागवड केली जाते. जेणेकरून पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल आणि पुढील संभाव्य नुकसान होण्यापासून रोखले जाईल..लागवड नियोजन- दरवर्षी साधारण १५ मे ते १५ जून या दरम्यान आले लागवडीचे नियोजन असते. तापमानाचा अंदाज घेऊन लागवड केली जाते. वातावरणातील तापमान साधारणपणे ३४ अंश सेल्सिअसच्या आत आल्यानंतर लागवड केली जाते. जेणेकरून वाढत्या तापमानाचा उगवणीवर परिणाम होऊ नये.- आले पिकास जास्त पाणी मानवत नाही. त्यामुळे आले लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करण्यास प्राधान्य दिले जाते. याशिवाय ठिबकद्वारे सिंचन करून पाण्याचा अपव्यय टाळला जातो..Ginger Farming: पावसामुळे सातारा जिल्ह्यातील आले लागवड रखडणार.- लागवडीपूर्वी एक महिना अगोदर साखर कारखान्यातून प्रेसमड आणून शेतात वापरली जाते. त्यातील ७० टक्के प्रेसमड मात्रा नांगरटीनंतर आणि उर्वरित मात्रा बेड तयार केल्यानंतर दिली जाते. तसेच कोंबडीखताचा देखील आवश्यकतेनुसार वापर केला जातो.- या वर्षी साधारण ५ जूनच्या दरम्यान लागवड करण्यात आली. लागवडीसाठी साडेचार फुटांचे बेड तयार केले जातात. त्यावर १० बाय १० इंच अंतरावर २५ ते ३० हजार आले कंदांची लागवड केली जाते..- लागवडीसाठी साधारणपणे ४० ते ५० ग्रॅम वजनाचे कंद निवडले जातात. लागवडीसाठी एकरी सुमारे एक टन बेण्याचा वापर केला जातो.- दरवर्षी बेणे बदल केला जातो. बेणे खरेदी करतेवेळी मुळकूज न झालेले निरोगी आणि दर्जेदार बेणे निवड करण्यावर भर दिला जातो.- लागवडीपूर्वी जैविक आणि रासायनिक बेणेप्रक्रिया करण्यावर भर दिला जातो. जेणेकरून उगवण चांगली होऊन कंदकूज व कंदमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल.- सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. या माध्यमातून काटेकोर सिंचनासह विद्राव्य खतांचे नियोजन केले जाते.- आले लागवडीवेळी रासायनिक खतांचे बेसल डोस दिले आहेत. आले लागवडीत सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला जातो. जेणेकरून रासायनिक खतांचा वापर व त्यावरील खर्चात बचत होण्यास मदत मिळेल..Ginger Farming : विदर्भात आल्यापासून शेतकऱ्यांना चांगला परतावा.मिरचीचे आंतरपीकदरवर्षी आले लागवडीत आंतरपीक घेतले जाते. जेणेकरून दरांतील चढउताराचा फटका बसू नये. आंतरपीक घेण्यामुळे उत्पादन खर्च निघण्यास मदत होते. आंतरपिकांच्या लागवडीमुळे बाजारात दरांतील चढ-उतारामुळे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळणे शक्य होते. आंतरपिकाची निवड करताना बाजारपेठेतील मागणी आणि आले पिकास होणारा फायदा आदी बाबी विचारात घेतल्या जातात.या वर्षी आले लागवडीमध्ये मिरचीचे आंतरपीक घेतले आहे. आल्याची साधारण ७० ते ८० टक्के उगवण झाल्यानंतर मिरची रोपांची लागवड करण्यात आली. तसेच आले लागवडीतील दोन ओळींतील मोकळ्या जागेत थोड्या प्रमाणात झेंडूची देखील लागवड केली आहे..मागील कामकाज :- पाऊस चांगला झाल्यामुळे आले लागवडीत तणांचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला होता. त्यासाठी मजूर महिलांच्या मदतीने तणनियंत्रण करण्यात आले.- आतापर्यंत आले पिकास दोन वेळा भर लावण्यात आली आहे. लागवडीनंतर दुसरी भरणी मिरची लागवड करण्यापूर्वी साधारण १५ जुलैच्या दरम्यान केली. त्यावेळी निंबोळी पेंड देण्यात आली..Ginger Farming : गादीवाफा पद्धतीने आले लागवडीवर भर.- ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शिफारशीत विद्राव्य खतांच्या वापरावर भर देण्यात आला. यामध्ये ०.५२.३४, १२.६१.० तसेच स्युडोमोनास आणि ट्रायकोडर्मा यांच्या मात्रा ठिबकद्वारे दिल्या आहेत. या सर्व मात्रा एक महिन्याच्या अंतराने देण्यात येत आहेत.- पिकाचे कीड-रोगाच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करण्यात आले. पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून आला. त्यासाठी रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी घेण्यात आली. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशकांची देखील फवारणी घेण्यात आली आहे.- अतिपाऊस झाल्यास पिकात पाणी साचून राहू नये यासाठी चर काढण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी त्वरित शेताबाहेर निघून जाण्यास मदत मिळते..आगामी नियोजनसध्या आले लागवड होऊन अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे.आगामी काळात जीवामृताचा वापर करण्याचे नियोजन आहे. तसेच ०.५२.३४, १२.६१.०, स्युडोमोनास आणि ट्रायकोडर्मा यांचा नियमित वापर करण्यात येईल.कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे निरीक्षण करून आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाईल..मागील दोन दिवसांपासून पाऊस चांगलाच आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असल्याने पिकात पाणी साचल्यास त्याचे विपरीत परिणाम होतात. पाणी साचून राहिल्यामुळे मुळकूज होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा केला जाईल.मुळकूजचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा व स्युडोमोनास यांच्या नियमित मात्रा दिल्या जातील. प्रादुर्भाव दिसून आल्यास शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील.- सुरेश माने, ९९७५८०८१९९ (शब्दांकन : विकास जाधव).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.