Farmers Issues: हमीभावाने सोयबीन, मूग व उडीद खरेदीसाठी केंद्रांचे वाटप करताना निकष डावलल्याचा आरोप मनसे शेतकरी सेनेने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास चुकीच्या पद्धतीने मंजूर खरेदी केंद्रे बंद पाडण्याचा इशारा प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी दिला.