Mumbai News: कृषी विभागातील विविध योजनांतील गैरव्यवहार तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे सुरू केलेल्या कृषी संस्था व उत्पादक कंपन्या आणि विक्री केंद्र याबाबतची चौकशी आता ‘यशदा’चे महासंचालक निरंजनकुमार सुधांशू यांच्याकडे देण्यात आली आहे..याआधी ही चौकशी निवृत्त सनदी अधिकारी डॉ. उमाकांत दांगट यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र दांगट यांच्यावरही आरोप करण्यात आल्याने त्यांनी ही चौकशी करण्यास असमर्थता दर्शविली होती..Agriculture Equipment Fraud: नागपूर कृषी अवजार घोटाळ्याची पुनर्चौकशी; PMOच्या आदेशानंतर कारवाईला वेग!.कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कृषी निविष्ठा व उत्पादक कंपन्या काढल्या असून, त्या मार्फत निविष्ठा खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. यातून मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तसेच गैरव्यवहार केलेल्या अधिकाऱ्यांची यादी ही त्यांनी जाहीर केली होती..याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला श्री. धस यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार या अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने चौकशी सुरू आहे. तसेच खात्यांतर्गत चौकशीसाठी आता यशदाचे महासंचालक सुधांशू यांची नियुक्ती करण्यात आली आहे..Agriculture Department Fraud: कृषी आयुक्तालय, आत्माकडून कापूस पिशव्यांची संशयास्पद खरेदी.गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर, शेखर गायकवाड आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनाही विचारणा करण्यात आली होती, मात्र त्यांनी नकार दिला असल्याचे समजते..ही चौकशी करताना आयुक्तांमार्फत यांच्याकडे देण्यात आलेल्या संबंधित चौकशी प्रकरणातील अधिकारी आणि कर्मचारी यांना विशेष चौकशी अधिकारी चौकशीसाठी बोलावू शकतात. चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी चौकशीस उपस्थित राहणे तसेच विशेष चौकशी अधिकारी यांनी मागवलेली माहिती व दस्तऐवज उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील, असे शासन आदेशात म्हटले आहे..चौकशीसाठी कालमर्यादा नाहीआमदार सुरेश धस यांनी कृषी अधिकाऱ्यांवर केलेले गंभीर आरोप पाहता या प्रकरणाची तत्काळ चौकशी होणे अपेक्षित होते, मात्र या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात अडकले असल्याने ही चौकशी जितकी लांबवता येईल तितकी लांबविली जात आहे. या कथित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या चौकशीचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात सहा महिने पडून होता. आता नव्याने विशेष चौकशी अधिकारी नेमले असले तरीही या चौकशीसाठी राज्य सरकारने कालमर्यादा दिलेली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.