Saline Land Reclamation Project: क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची भेट
Agriculture Training: प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) कोल्हापूर व नागपूर येथील वनामती यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यात विविध क्षेत्रांतील गट ब अधिकाऱ्यांनी श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळ तसेच घालवाड येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट देऊन तांत्रिक माहिती घेतली.