Nashik News: मालेगाव पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या हरणबारी व केळदार मध्यम प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. रब्बी हंगामातील सिंचन नियोजन, कालव्यांची दुरवस्था, पाणी व्यवस्थापनातील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच कालवा दुरुस्ती आणि गाळ काढण्याबाबत पाणीवापर संस्थाना प्राधान्य देण्याचे ठरले..या बैठकीस खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार दिलीप बोरसे, कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उपविभागीय अभियंता स्वप्नील खैरनार, शाखा अभियंते प्रथमेश थेटे, शुभम चौधरी, विजय मोगल, सिंचन प्रमुख प्रदीप जोशी आदींसह लाभक्षेत्रातील बागायतदार व पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले..Agriculture Irrigation: वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेचे पहिले आवर्तन सुरू.ब्राह्मणगावचे यशवंत अहिरे, मोराणेचे बाळासाहेब भदाणे, पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष बिपिन सावंत, राजेंद्र जाधव, कौतिक पाडे येथील प्रेमराणा मगर आदी शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. बागायतदारांनी कालवे सेवापथांची दुरुस्ती, कालवा भराव व गाळाची साफसफाई, कालवे व वितरिकांच्या द्वारांची दुरुस्ती, नदीद्वारांची दयनीय अवस्था, केळझर डाव्या कालव्यावरील चारी क्रमांक. ८ ची तातडीची दुरुस्ती धरणात साचलेला गाळ काढण्याचा सूचना मांडल्या,.पाणी वेळेवर न मिळाल्यास शेतीवर होणारा परिणाम याविषयी उपस्थित शेतकरी तक्रारी मांडल्या. कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे आवाहन केले. सिंचन व्यवस्थेचे विकेंद्रीकरण झाल्यास पाणी नियोजन अधिक प्रभावी होईल, सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वेळेत भरणे, कालव्यांवरील अतिक्रमणे हटविणे आणि कालव्यांची निगा राखणे याबाबत माहिती दिली. डॉ. बच्छाव यांनी सिंचन व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज मांडली..रब्बी हंगामातील आवर्तनहरणबारी धरणाचे आवर्तन....२१ जानेवारी २०२६केळझर धरणाचे आवर्तन....१ फेब्रुवारी २०२६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.