Washim News: ‘‘शेत पाणंद रस्ते ही योजना पायाभूत सुविधा शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली आहे. त्यामुळे रस्त्यांची निवड, आराखडे, सीमांकन व निधी नियोजन या सर्व बाबी अत्यंत काळजीपूर्वक कराव्यात. ग्रामपंचायती, कृषी विभाग व महसूल यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करावीत,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले..शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांची दळणवळण व्यवस्था सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते..Farm Roads: पाणंद, शेतरस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा.या सभेला रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी संजय नागटिळक, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालीदास तापी, भूमी अभिलेख जिल्हा उप अधीक्षक शिल्पा सानप, गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने उपस्थित होते..जिल्हाधिकारी कुंभेजकर पुढे म्हणाले, की योजनेतील प्रत्येक काम नियोजनबद्ध, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे. तालुकास्तरीय समित्यांनी ६ फेब्रुवारीपर्यंत विधानसभा क्षेत्रीय समितीकडे सर्व प्रस्ताव व आराखडे सादर करावेत. ग्रामपंचायतींची स्पष्ट जबाबदारी निश्चित करून लेखी अहवाल सादर करावेत. प्रत्येक तालुक्याने रस्त्यांचे सविस्तर आराखडे तयार करून त्यासाठी लागणाऱ्या निधीचे अचूक नियोजन करावे, असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले..Farm Roads: धाराशिव जिल्हा नियोजन समितीकडून ३२१ रस्त्यांसाठी निधी.कृषी विभागामार्फत प्रत्येक तालुक्याने योजनेतून लाभ झालेल्या व प्रगती साधलेल्या पाच शेतकऱ्यांची माहिती विधानसभा क्षेत्रीय समिती व जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. यासोबतच प्रपत्र अ व प्रपत्र ब तसेच प्रपत्र एक व प्रपत्र दोन अचूकपणे तयार करून त्यांचे संकलन करावे, अशा सूचनाही दिल्या..गाव नकाशा तयार करून रिमार्केशन करणे अत्यावश्यक असून, त्यासाठी सीमांकनाची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी. रस्त्यांची स्पष्ट ओळख (आयडेंटिफिकेशन) करून सीमांकनाचे नियोजन करावे व कामाच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घ्यावा, असेही ते पुढे म्हणाले. कामांमध्ये कोणताही विलंब किंवा त्रुटी आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला उपविभागीय अधिकारी, जिल्हयातील सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.